Categories: कृषी

शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

मुंबई। महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या ‘महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या अंमलबजावणीकरिता १० हजार कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने तसेच राज्यपालांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येईल.

  • महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनायादी शुक्रवार (२८ फेब्रुवारी) जाहीर केली जाणार.
  • योजनेचा लाभ देण्यासाठी बायोमेट्रिक पध्दतीचा होणार अवलंब.
  • याद्या अपलोड करण्याचे काम ९९ टक्के पूर्ण.
  • शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन

सध्या आकस्मिकता निधीची मर्यादा दीडशे कोटी इतकी आहे. या मर्यादेत १० हजार कोटींची तात्पुरती वाढ करून ती आता १०,१५० कोटी इतकी करण्यात येईल. शासनाने २२ फेब्रुवारी २०२० पासून ही योजना कार्यान्वित करण्याचे ठरविले आहे. ५ मार्चपर्यंत या योजनेसाठी १० हजार कोटींची आवश्यकता असल्याने आकस्मिकता निधी अग्रीम घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Farmer loan waiver Scheme महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महाविकास आघाडी कर्जमुक्ती योजना शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमुक्ती योजना