Categories: आरोग्य राजकीय सामाजिक

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह, लोकांना केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन!

मुंबई | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुश्रीफ यांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरवरून दिली असून, संपर्कात आलेल्यांना स्वतःची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन असे सांगितले आहे. सध्या मुश्रीफ यांची तब्येत चांगली असल्याचेही त्यांनी या ट्विटमधून सांगितले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी लोकप्रतिनिधींना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यातील सर्वांनीच कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आत्तापर्यंत आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, खासदार संजय मंडलिक, खासदार राजू शेट्टी, माजी आमदार महादेवराव महाडिक  यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात आता ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचीही भर पडली आहे.

Team Lokshahi News