Categories: Featured गुन्हे

जितेंद्र आव्हाड ‘तुझा दाभोलकर होणार’ तरूणाची धमकी

हेही वाचा : जितेंद्र आव्हाड प्रकरणात ट्रोलर्सच्या पाठीमागे फडणवीस आणि डावखरे तर नाहीत ना?

मुंबई  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दाभोळकर करण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांना ‘तुझा दाभोलकर होणार,’ अशी धमकी कैलासराणा सुर्यवंशी नावाच्या एका तरुणाने ट्विटरवरुन दिली आहे. काल झालेल्या मारहाण प्रकरणानंतर ही धमकी देण्यात आली आहे. 

ठाण्यातील एका तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केल्यामुळे जितेंद्र आव्हाड सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहिल्यामुळे आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप तरुण करत आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांचे नाव चर्चेत असून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीकाही होत आहे. 

यापूर्वीही या तरूणाने जितेंद्र आव्हाड, शरद पवार, अजित पवार या नेत्यांविषयी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून असभ्य भाषा वापरल्याचे दिसून येत आहे. तसेच हा तरूण स्वतःला मोदीभक्त असल्याचेही उघडपणे काही पोस्टमधून सांगत असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत असून याबाबत सोशल मीडियावरही संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्यातच ‘तुझा दाभोलकर होणार’ असा धमकीवजा इशाराच एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांना दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

Team Lokshahi News