Category: Blog

  • प्रत्येक आईने आपल्या मुलीला असं ठणकावून सांगितलं तर.. अर्थात कदाचितच!

    आमच्या ओळखीत एक ताई आहेत. घरकाम करतात. त्यांच्या मुलीचं लग्न झालं गेल्यावर्षी. लग्नाला जाता आलं नाही म्हणून मी दोन तीन महिन्यांनी गेले. चहापाणी झालं. आहेराचं पाकीट देऊन झालं. गप्पा चालूच होत्या की मी विचारलं, “काय म्हणते पिंकी? रुळली का सासरी?” “हो. रुळली.” – ताई “माहेरपणाला येऊन गेली असेल ना?” – मी “हो. आखाडाची माघारीण आणली…

  • माणसा माणसा, दगड बन!

    जनरल डबा, स्लीपर आणि एसी.. किती जमीन-आस्मानचा फरक… एकाच झटक्यात सगळा ‘भारत’ दिसतो..! नाशिक रोडवरून मुंबईला येण्यासाठी रात्री पवन एक्स्प्रेससाठी थांबले होते. माझ्या सोबतीला पायाला पोलिओ झालेली एक व्यक्ती. त्यांच्याकडे अपंग सर्टिफिकेट मूळ प्रत असूनही काहीतरी कारण सांगून सवलत तिकीट दिलं नाही. मी खूप भांडले त्या कर्मचाऱ्यांशी. ‘मदत तर करतच नाहीत, पण त्या व्यक्तीचा हक्कही…

  • कोल्हापुरचा फुटबॉल इर्षेवर की खुन्नसपणावर… Kolhapur Football

    सुधाकर काशीद, तरुण भारतठराविक संघ, ठराविक खेळाडू त्यांच्यातली खुन्नस आणि शाहू स्टेडियमची ठराविक गॅलरी यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉलचा (Kolhapur Football) काही जणांच्याकडून पोरखेळ केला गेला आहे. प्रत्येक स्पर्धेत गोंधळ हा ठरलेलाच आहे. पण त्यातही कालचा गोंधळ बरा होता असे म्हणायची आता वेळ आली आहे. कोल्हापूरकरांना पेठेची अस्मिता आहे. पण अस्मिता जपता जपता खुन्नसच जास्त वाढली जात…

  • वेदनेच्या व्याख्या मुक्या असतात, त्या माणसाला ‘सरेंडर’ व्हायला भाग पाडतात..! I QUIT..!

    I QUIT…वेदनेच्या व्याख्या मुक्या असतात, त्या माणसाला ‘सरेंडर’ व्हायला भाग पाडतात..! पुरूष कणखर होता,आहे आणि असणारच पण तो सुद्धा त्याच्या मर्यादा कधी ओलांडेल आणि माणूसपणाची लख्तरं कधी वेशीला टांगेल हे कधीच कुणाला सांगता येणार नाही.. ते सिद्ध होणार नाही..! आपण पुर्वापार एकीवात असणारा ‘राम’ आणि ‘रावण’ वर आभाळ हाणत असतो पण तसं पाहिलं, ते दोघं…

  • ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरा, अन्यथा होईल कारवाई? म्हणूनच जाणून घ्या काय आहेत याचे नियम.. Grampanchayat

    ग्रामपंचायत ही राज्य व्यवस्थेचा पाया आहे. ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीला (Grampanchayat) शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरीही तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेकदा कर वसूली नसेल तर ग्रामपंचायतींना आर्थिक अडचणी येतात. ग्रामपंचायतीच्या पट्ट्या भरणे, तसेच…

  • जास्त काही करु नकोस.. एवढंच करुन बघ दोस्ता!

    जास्त काही करु नकोस दोस्ता. राज्यातलं एक घर शोध. कोणतं घर, ते समजेलच तुला. अंधारल्या स्वयंपाकघरात भाकऱ्या थापणारी म्हातारी माय दिसेल. कपाळावरचा घाम पदराने टिपता टिपता चुलीतल्या निखाऱ्यावर ती फुंकर मारत असेल. तिच्यासमोर जाऊन बस. खोली शेणाणे सारवलेली असेल. लाजू नको. निवांत बस. ती हसून म्हणेल, ‘भूक लागली का रं लेकरा?’ होय म्हण. तवलीभर दुध…

  • कुणबी दाखला कसा काढायचा? त्यासाठी कोणते पुरावे ग्राह्य धरणार? जाणून घ्या सविस्तर | How to get Kunbi Certificate

    मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल, अशी मागणी मनोज जारंगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर केली. सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या जरांगे पाटील यांनी नंतर संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे…

  • ग्रामपंचायत निवडणूकांच्या निकालावरील राजकीय पक्षांच्या जनादेशाचा दावा म्हणजे ‘एक हात लाकूड अन् नऊ हात ढलपी’!

    ग्रामपंचायतीच्या निवडणूका या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नाहीत. या निवडणूकांमध्ये स्थानिक पातळीवर एकत्र येवून गाव-पुढाऱ्यांनी पॅनेल केलेली असतात. या पॅंनेलमध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते आपली पक्षीय झूल खुंटीवर ठेवून स्थानिक मुद्दे, स्थानिक अस्मिता व गावकी-भावकीतील जिरवाजिरवी करत मागील निवडणूकांतील भूमिकांचे उट्टं काढण्यासाठी एकत्र आलेले असतात. त्यामुळे अशा पॅनेलच्या केवळ पॅनेलप्रमुखावरुन संबंधित पॅनेल कोणत्याही राजकीय पक्षाचे ठरवणे…

  • फेसबुक जगतात सध्या ‘सप्तपर्णी’ वृक्ष हटावची चळवळ सुरु आहे, त्या निमित्ताने… Saptaparni Tree

    सप्तपर्णी उर्फ सातविण वृक्षांची कत्तल करुन हे विषारी वृक्ष संपवा असा विषारी प्रचार सुरु आहे. वास्तविक यात Saptaparni Tree चा काहीच दोष नाही. मात्र हिटलरने जसा ज्यूंचा वंशविच्छेद केला तसा सप्तपर्णीचा वंशविच्छेद करावा म्हणून एक व्यापक चळवळ आकारास येत असल्याचे पाहिले. साहजिकच सप्तपर्णीला नीच ठरवण्यासाठी हे वृक्ष विदेशी वनस्पती असून, अत्यंत विषारी आहेत. सप्तपर्णी अत्यंत…

  • दहा पंधरा मिनीट झाली की त्यांना गुदमरायला होतं; पाणी..भुयार आणि कोल्हापूर! Water subway and Kolhapur

    कोल्हापूर | दहा पंधरा मिनीट झाली की त्यांना गुदमरायला होतं. ते चॅनेलच्या बाहेर येतात. चॅनेल कसलं दगडी भुयारच ते. हे भुयार म्हणजे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्राचं दगडी चॅनेल. १९४६ साली भोगावती नदीच्या पात्रात बांधलेलं. २०१९ साली या चॅनेलचे दगड आतल्या आत कोसळले. अर्थात त्यामुळे जॅकवेलमध्ये पाणी तटत, तटत येत राहिलं…. पण…