Category: News

  • 5 स्पटेंबर 2022 रोजीच अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशासाठी दिल्या होत्या शुभेच्छा..! जुनी पोस्ट व्हायरल

    तुषार गायकवाड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा तसेच विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले असले तरी राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानच अशोक चव्हाण भाजप मध्ये जाणार असल्याचे आम्ही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते… ही पोस्ट 5 स्पटेंबर 2022 रोजी लिहिलेली असून त्याची ओरिजनल लिंक…

  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडला..; भाजपात सामील होणार? Ashok Chavan Resign

    माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली आहे. चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटलंय की, “मी दिनांक 12/02/2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन…

  • MSCE Pune शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध | MSCE Pune Scholarship Exam 2024

    पुणे | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत घेतली जाणार आहे. मंडळाने या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले असून, विद्यार्थ्यांनी ते शाळेतून प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य परीक्षा परिषदेने शाळेच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांची…

  • छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

    मुंबई | अन्न व पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काल (4 फेब्रुवारी) अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार सभेत मोठा गौप्यस्फोट केला. मी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं ते म्हणाले. 17 नोव्हेंबर रोजी अंबड येथे पहिली ओबीसी एल्गार सभा झाली. त्या सभेला जाण्याआधीच म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी मी राजीनामा दिला होता असे…

  • Poonam Pandey: ‘प्रसिद्धीसाठी Fake News पसरवणाऱ्या पूनम पांडेवर कारवाई

    मुंबई | प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला मृत्यूची खोटी बातमी पसरवणे महागात पडले आहे. आता पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. तर तिच्या चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. पूनमच्या मॅनेजरने तिच्या मृत्यूची बातमी इंस्टाग्रामव्दारे पोस्ट केली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले…

  • जिंदा हू मैं..! पूनम पांडेला वाहिलेली श्रध्दांजली आम्ही मागे घेतो! Poonam Pandey

    मुंबई | प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी सतत फालतू माकळचाळे करणाऱ्या पूनम पांडेने यावेळी मात्र कहरच केला. अभिनेत्रीने स्वतःच्या मृत्युचीच खोटी बातमी सर्वत्र पसरवून सर्वांना धक्का दिला. तिच्या या कृत्याने तिच्या चाहत्यांना मात्र अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले. परंतु पूनम पांडे जिवंत असल्याचे समोर आल्याने तिने हा ड्रामा केवळ जनजागृतीच्या नावाखाली प्रसिध्दी मिळवण्यासाठी केल्याची चर्चा आहे. पूनम…

  • RBI च्या कारवाईने Paytm ग्राहकांची चिंता वाढली; ‘पेटीएम’ बंद झाल्यानंतर अकाऊंटमधील पैशांचं काय? RBI Banned Paytm

    मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) बँकेविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी (RBI banned Paytm) घातली आहे.आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्सची मात्र चिंता वाढली आहे. आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र…

  • काम कमी, वाद जास्त करणाऱ्या कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची अखेर बदली | Rahul Rekhawar

    कोल्हापूर | राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोल्हापूरचे वादग्रस्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी अमोल येडगे यांची कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल येडगे हे सध्या संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे येथे संचालक म्हणून कार्यरत असून ते लवकरच कोल्हापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार…

  • बोल.. आहे दम तुझ्या पार्श्वभागात??? किरण मानेंनी पुष्कर जोगची लायकीच काढली!

    मुंबई | सध्या आरक्षणाच्या आणि जातगणनेच्या सर्व्हेवरून चांगलाच गदारोळ माजला आहे. सोशल मीडियावर अनेक जण आपला संताप व्यक्त करत आहेत. काही कलाकारांनी देखील यावर टीका करत आपली मतं सोशल मीडियावर व्यक्त केली आहेत. यातच ‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेता पुष्कर जोग याने देखील जातगणना सर्व्हेवर आपली प्रतिक्रिया दिली. या दरम्यान त्याची जीभ घसरली. अभिनेता पुष्कर जोग याने…

  • बीएमसी कर्मचाऱ्यांच्या संबंधित पुष्कर जोगच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिजीत केळकर संतापला, पत्र लिहित म्हणाला…

    मुंबई | मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग सध्या चांगलाच चर्चेत आहे. पुष्करने काहीच दिवसांपुर्वी बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल विधान केल्याने बराच वाद झाला होता. यामुळे पुष्करवर चहूबाजूंनी टिका झाली. अखेर या विधानाबद्दल पुष्करने माफी मागितली. अशातच बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत केळकरने पुष्करच्या विधानाबद्दल त्याला सोशल मीडियावर एक पत्र लिहीलंय. यामध्ये पुष्करच्या विधानाबद्दल अभिजीतने त्याला चांगलच सुनावलयं… प्रिय मित्र…