पुणे | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील रिक्त जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. तत्पूर्वी ज्या पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंद केले आहे अशांनी मतदान यादीत आपले नाव तपासून ते योग्य असल्याची खात्री करावी. जर यादीत नाव नसेल तर तात्काळ नोंदणी करावी. या दोन्ही प्रक्रिया अत्यंत सोप्या असून घरबसल्या मोबाईलवर देखील पूर्ण करता येतात. त्यासाठी खालील लिंकचा आधार घ्यावा लागेल.
नाव चेक करण्यासाठी लिंक –
https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/
पदवीधर मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी लिंक –
https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx