Categories: कृषी

मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांचं सावकारी कर्जही माफ, ठाकरे सरकारचा निर्णय

औरंगाबादमहाविकास आघाडीने सत्तेवर येताच शेतकरी वर्गाला दिलासा देणारे निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेबरोबरच आता विदर्भ मराठवाड्यातील सावकारी कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथील शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी घेतला आहे. 

नुकतंच पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील, तर शासनामार्फत संबंधीत सावकारास ती रक्कम अदा करण्यात येईल. त्यामुळे सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.

सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ही अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे. त्या शेतकऱ्यांचीही कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ६५ कोटी इतक्या रक्कमेची तरतूद केली आहे. असेही या शासन निर्णयात म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी “ज्या शेतकऱ्यांचं पीककर्ज २ लाख रुपयांपर्यंतचं आहे, त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. महात्मा फुले कर्जमाफी योजना असे या कर्जमाफी योजनेचे नाव आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: ठाकरे सरकार महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्ज माफी यादी महात्मा फुले कर्ज माफी योजना महाविकास आघाडी सरकार सावकारी कर्ज