Categories: कृषी

शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई | महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने १८ हजार ९८० कोटी रुपये जमा केले आहेत. 

सरकार, शेतकरी व कामगार वर्गावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगून महाराष्ट्राचे कल्याणकारी (welfare state) राज्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीविषयी माहिती दिली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सुमारे १८ हजार ९८० कोटी  रुपये बँक खात्यात जमा करुन २९.५० लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. या योजनेचा सरकारी कर्मचारी किंवा उत्पन्न कर भरणारे शेतकरी यांना लाभ दिला जात नाही. तर खरोखर गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ दिला जात आहे. ऊस आणि फळांसह अन्य पारंपारिक शेती करणारे राज्यातील शेतकरी या योजनेंतर्गत लाभ घेत आहेत.

Team Lokshahi News