Categories: राजकीय

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज आणि उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूरमुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज, कोल्हापूर दौऱ्यावर येत असून आज आणि उद्या ते कोल्हापूरात आहेत. आज सायंकाळी ४ वाजता त्यांचे मुंबईहुन कोल्हापूर विमानतळावर आगमन होत असून मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच कोल्हापूरात येत आहेत. इस्लामपूर (ता. वाळवा) येथील कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूरातून हेलिकॉप्टरने इस्लामपुर कडे रवाना होणार आहेत. इस्लामपूर येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून पुन्हा रात्री कोल्हापुरात मुक्कामाला येणार आहेत. शनिवारी सकाळी ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते विमानाने मुंबईला रवाना होणार आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Breaking News Maharashtra cm Uddhav Thackeray Kolhapur News Kolhapur news in marathi Maharashtra Maharashtra CM Maharashtra News Maharashtra News Headlines Marathi Batmya Marathi Batmya Maharashtra Marathi Breaking News Marathi News Marathi News Portal news maharashtra कोल्हापूर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे