मुंबई : लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नसल्याचे सांगत गर्दी न करता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या अफवांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून खंडन केले आहे.
“लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करु नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या” असे ट्वीट CMO कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.