Categories: Featured प्रशासकीय राजकीय सामाजिक

कलेक्टर साहेब… ‘यासाठी’ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा – सोशल मिडीयावर व्हायरल झाली पोस्ट

कोल्हापूर। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी सोशल मिडीयावर जोर धरू लागलीय. यासंदर्भात सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत असून जिल्हाधिकारी साहेब गुन्हा दाखल करा अशी मागणी… एक कोल्हापूरकर या नात्याने केली जातेय. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट कोरोना संदर्भात असून चंद्रकांत पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करून पुणे कोल्हापूर प्रवास केला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणपत्र, सोशल डिस्टंसिंग यासारखे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचंही म्हणटलं आहे.  काय ही पोस्ट वाचा सविस्तर…

आमच्या घरातील मी, बायको, मुलगा मुबंईहुन आलो. आम्हाला परवानगी घ्यायला व वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन यायला पंधरा दिवस गेले… कोल्हापूरात येताना चार ठिकाणी तपासणी करून… शेवटी सीपीआर मध्ये (कोविड-19) तपासणी करून स्वॅब दिला… रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी पंधरा दिवस विलगीकरण केंद्रात (कॉरंनटाईन) करून ठेवलं… कारण… मुंबई, पुणे, नाशिक सह परजिल्ह्यातील रेडझोन मधून येणाऱ्या नागरिकांना हा नियम लागू केला… ठीक आहे आम्ही सरकार सांगेल तसं आज पर्यंत करत राहिलो…! आज पर्यंत पंतप्रधान मोदी जी, मुख्यमंत्री ठाकरे जी यांच्यासह सर्वांचं ऐकलं… इथून पुढे ही ऐकू… 

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब उत्तर द्या… मात्र एक खेदजनक बाब म्हणजे… चार दिवसांपूर्वी माजी पालकमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरात आले… पुणे हुन… इतर जिल्ह्यात जाण्यासाठी त्यांनी परवानगी घेतली होती का? चंद्रकांत पाटील यांची तपासणी कुठे झाली? सीपीआर मध्ये स्वॅब घेतला का? घेतला असेल तर रिपोर्ट येई पर्यंत कुठे कॉरंनटाईन केलं? रिपोर्ट काय आला? कोरोना हा काही विशिष्ट वर्गाला होत नाही… यामध्ये सर्वाना संसर्ग होऊ शकतो हे माहिती असून सर्वांना एक नियम पाहिजे… त्या नियमाचे पालन झालं का? चंद्रकांत पाटील हे रेडझोन मधून कोल्हापूरात आल्यानंतर किती जण संपर्कात आलेत याची तपासणी केली आहे का? (माझ्या माहिती प्रमाणे 160 जण भेटले…पत्रकार धरून)  क्लेकटर साहेब… आम्ही  ज्या ठिकाणहुन कोल्हापूरात आलो त्या ठिकाण परिसरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता, मात्र आम्ही तूम्ही सांगितलेले सर्व नियम पाळले… मात्र चंद्रकांत पाटील यांनी का नियम पाळला नाही हे पण आम्हाला सांगा?  

कोरोना संकट विरोधात कलेक्टर साहेब तुम्ही व आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हा परिषद सीईओ, सीपीर वैद्यकीय अधिकारी, सगळी चांगलं काम करता मात्र आज वरील नमूद कारणास्तव प्रामाणिक राहून… आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करावी ही विनंती… एक कोल्हापूरकर!

  • दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्याने मोठे केले, असे असताना कोरोनाच्या काळात कोल्हापूरची जनता मेली का जगली हेसुध्दा पाहण्यासाठी चंद्रकांत पाटील पुण्यातून कोल्हापूरात आले नाहीत अशी टिका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्यामुळे चंद्रकात पाटील कोल्हापूरात आल्याचे बोललं जातयं.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वरील नमूद पोस्ट मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे गुन्हा केला असेल तर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात हे मात्र यानिमित्ताने पहावं लागणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण आमदार चंद्रकांत पाटील एक कोल्हापूरकर चंद्रकांतदादा पाटील जिल्हाधिकारी दौलत देसाई भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा दाखल करा भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188