Categories: कृषी बातम्या राजकीय

कोल्हापूर : शेतकरी व कामगार कायद्याविरोधात कॉंग्रेसचा ‘भाजप हटाओ, देश बचाओ’चा नारा

कोल्हापूर | केंद्रातील भाजप सरकार शेतकरी व कामगार विरोधी कायदे संमत करत असून कॉंग्रेस पक्षाने याला तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसने आंदोलन केले असून भाजप सरकारचा तीव्र निषेध केला आहे. भाजप सरकारने आणलेल्या या काळ्या कायद्यांविरोधात देशभरात ‘किसान बचाओ, देश बचाओ’ मोहिम हाती घेण्यात आली असून ‘भाजप हटाओ, देश बचाओ’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

देशातील भाजप सरकार बहुमताच्या जोरावर विविध कायदे संमत करून घेत आहे. यामध्ये शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यांचाही समावेश आहे. भाजपच्या या वृत्तीमुळे भांडवलदारांच्या हाती देशाची सर्व सूत्रे जात असून सर्वसामान्य रस्त्यावर येत आहेत. नुकतेच केंद्र सरकारने कृषिची दोन विधेयके संमत करून त्यांचे कायद्यात रूपांतर केले आहे. त्याचबरोबर कामगार विरोधी कायदेही संमत केलेत. भाजपची ही धोरणे सर्वसामान्यांना उध्दवस्त करणारी आहेत. त्यामुळे याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसने आंदोलन पुकारले आहे. 

Team Lokshahi News