Categories: कृषी बातम्या राजकीय

कृषि कायद्याविरोधात कोल्हापूरात कॉंग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली

कोल्हापूर | केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आज कोल्हापूरात भव्य ट्रक्टर रॅली काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार पी एन पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली. यावेळी सतेज पाटील यांनी ट्रॅक्टरचं स्टिअरिंग स्वतःच्या हाती घेतल्याचे पहायला मिळाले.

सकाळी अकराच्या सुमारास संभाजीनगर परिसरात निर्माण चौकातील पाटील यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीमध्ये सुमारे ५०० हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात संपूर्ण देशभर वातावरण निर्मिती करण्यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आजची ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही रॅली दसरा चौक परिसरात दाखल झाली. 

रॅलीत सकाळपासून कार्यकर्ते मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन सामील झाल्याचे पहायला मिळाले. भर उन्हात ही कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत होता. रॅलीचे ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले.

Team Lokshahi News