Categories: प्रशासकीय सामाजिक

मार्च ते ऑगस्ट दरम्यान जर तुमच्याकडून कर्ज वसुली झाली असेल तर ‘अशी’ करा तक्रार..!

कोल्हापूर | मायक्रो फायनान्स कंपन्यामुळे सर्वसामान्यांना कर्जवसूलीसाठी वेठीस धरण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपनीबाबत तक्रार असल्यास ग्राहकांनी 18001021080 या टोल फ्री क्रमांकावर आपल्या तक्रारी कराव्यात, असे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

याबाबत आणखी काही मदत लागल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे मदतीच्या विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. रिजर्व बँक ऑफ इंडियाव्दारे ग्राहकांना त्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्यास ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत सर्व बँका व वित्तीय संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. विविध बँका व वित्तीय संस्थांमार्फत रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या सवलतीची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. तरी काही ग्राहकांची विविध मायक्रो फायनान्स कंपनीबद्दल तक्रारी आढळून येत आहेत. तसेच ग्राहकांमध्ये तक्रारींचे निवारणाबाबत संभ्रम दिसून येत आहे. ही सुविधा मराठी भाषेमध्येसुध्दा उपलब्ध असल्याने सर्व ग्राहकांनी या क्रमांकावर आपल्या तक्रारी नोंद कराव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.

Team Lokshahi News