Categories: आरोग्य

RCB च्या खेळाडूला Corona Virusची लागण, तर रिकाम्या मैदानात होणार भारत-द. आफ्रिका सामना

मुंबई। करोनामुळे अनेक ठिकाणी क्रिकेट सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत. संक्रमणाच्या भितीमुळे क्रिकेट समितीनं हा निर्णय घेतला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आरसीबीच्या एका खेळाडूला करोनाची लागण झाली आहे. त्याला सध्या संघापासून वेगळं ठेवण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान खेळाडू केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं रिचर्डसनला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. केनला काही दिवसांपूर्वी खोकला आणि तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची तापसणी करण्यात आली. यामध्ये त्याला करोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले झाले आहे. सध्या रिचर्डसनला संघापासून वेगळं ठेवण्यात आलं असून तो देखरेखीखाली आहे. केन रिचर्डसन आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळतोय. 

करोनाची लागण झाल्यामुळे केन आगामी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेलाही मुकणार आहे. त्याशिवाय आयपीएललाही तो मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. केन रिचर्डसन आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळतोय. 

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरीत दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे. १५ आणि १८ मार्च रोजी अनुक्रमे लखनौ आणि कोलकाता येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये हे दोन सामने खेळवण्यात येणार असून, बंगाल क्रिकेट संघटनेने तिकीट विक्री स्थगित केली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितले. 

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना प्रेक्षकांची गर्दी टाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी आधीच तिकिट खरेदी केलेले आहे त्यांचं आठवडाभरात पैसे मिळणार असल्याची महितीही बीबीसीआयकडून देण्यात आली आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: corona news Corona virus coronavirus cricket corona virus Indian Medical Association