Categories: Featured गुन्हे

कोरोनाच्या धास्तीने मुंबईहून परतताना शाहूवाडीच्या कुटूंबियाचा लहान मुलासह अपघाती मृत्यु

कोल्हापूर। कोरोनाच्या धास्तीने मुंबईहून परतताना शाहूवाडी तालुक्यातील एका कुटूंबाचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झालाय. तालुक्यातील जांभूर  येथील सर्जेराव भीमराव पाटील (वय ३३) पुनम सर्जेराव पाटील (वय २७) अभय सर्जेराव पाटील (वय ) अशी मृतांची नावे आहेत.  मुंबई वरून येताना कराड जवळ गाडी घसरून त्यांचा अपघात झाल्याने उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या घटनेने शाहुवाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जांबुर तालुका शाहूवाडी येथील सर्जेराव पाटील हे मुंबई डोंबिवली येथे राहण्यास होते. ते खाजगी कंपनीत नोकरी करत होते. कोरोना च्या धास्तीने सर्वजण गावाकडे परतू लागले आहेत. सर्वत्र संचार बंदी असल्याने गावी येण्यासाठी सर्जेराव पाटील हे आपल्या पत्नी व मुलग्या सह दुचाकीवरून जांभूर या गावी येत होते.

दरम्यान, मंगळवार चोवीस मार्च रोजी कराड येथे त्यांची दुचाकी घसरून ते पडले असता गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटल दाखल केले असता उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला आहे. प्रत्येक जण सुरक्षित राहण्यासाठी मिळेल त्या वाहनाने आपल्या कुटुंबासमवेत घरी परतत आहेत. याच भावनेने पाटील कुटुंबीय गावी येत असताना नियतीने त्यांच्यावर घातलेला घाला मनाला चटका लावणारा असून त्यांच्या या अपघाती निधनाचा धक्का कुटुंबीयांना बसला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team Lokshahi News