Categories: Featured

राजारामपुरीतील ‘या’ प्रसिध्द हॉस्पीटलमधील डॉक्टरला कोरोनाची लागण; हॉस्पीटल परिसर सील!

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात आज ५३ कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातच आज तब्बल १६ पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा आकडा वाढतानाच दिसत आहे. आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये राजारामपुरी येथील जानकी हॉस्पीटल मधील डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा परिसर प्रशानाने सील केलाय.

राजारामपुरीतील तिसऱ्या गल्लीत असणारे हे हॉस्पीटल रूग्णांनी सतत गजबजलेले असते, त्यामुळे हे डॉक्टर अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यामुळे संसर्गाची भिती वाढली आहे. 

आज रात्री ८ वाजेपर्यंत प्राप्त ५३ पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड- ९, गडहिंग्लज-२, करवीर-५,  शिरोळ-३, नगरपरिषद क्षेत्रातील -१७, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात-१६ इतर राज्य १ असा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १२३६ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ८५० रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण २५ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३६१ इतकी आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur corona