Categories: आरोग्य सामाजिक

बहिरेश्वर मधील ‘त्या’ दोन महिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; गावकऱ्यांची धास्ती वाढली..!

कोल्हापूर | करवीर तालुत्यातील बहिरेश्वर गावातील दोन महिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे. या दोन्ही महिला कोल्हापूरातील एका खासगी दवाखान्यात काम करत असल्याची माहिती आहे. या महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ग्रामपंचायत आणि दक्षता समितीने या महिला राहत असलेल्या गल्लीत कडक लॉकडाऊन केले आहे. 

या महिलांच्या सोबत गावातील आणखी दोन महिला दवाखान्यात काम करतात. दवाखान्यातील एका रूग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपर्कात आलेल्या या चारही महिलांचे स्वॅब तपासणीसाठी दोन दिवसापूर्वी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज प्राप्त झाला आहे. यातील चार पैकी दोन महिला कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावकऱ्यांची धास्ती वाढली आहे. 

दरम्यान या दोन महिलांच्या संपर्कातील दोन खासगी डॉक्टरसह १९ जणांना तपासणीसाठी सीपीआर मधील कोवीड सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे. 

Team Lokshahi News