Categories: आरोग्य बातम्या सामाजिक

कोरोना : आरटीपीसीआरचे सुधारित दर निश्चित; ‘हे’ आहेत नवे दर..!

कोल्हापूर | कोविड-19 तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल व आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी शासनाने ७ सप्टेंबरच्या शासननिर्णयानुसार सुधारित दर निश्चित केले आहेत. निश्चित केलेले दर सर्व करासहित निश्चित केले असून कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला या दरापेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत.

नवीन दरानुसार संकलन ठिकाणावरुन नमुन्याची निवड करणे, नमुन्याची वाहतुक आणि अहवाल देणे/रिपोर्टींग करणे यासाठी १२०० रुपये, नमुना संग्रह ठिकाणाहून नमुना घेणे, कोविड केअर कलेक्शन सेंटर, हॉस्पिटल, दवाखाना, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा इत्यादी ठिकाणाहून नमुना घेणे यासाठी १६०० रुपये आणि रुग्णाच्या वास्तव्यापासून रुग्णाचा नमुना घेणे, नमुन्याचे वहन, तपासणी आणि अहवाल यासाठी २००० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या दरामध्ये व्हीटीएम, पीपीई, आरएनए एक्सट्रॅक्शन किट, आरटीपीसीआर किट आदी बाबींचा समावेश आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: RTPCR news rates