Categories: आरोग्य सामाजिक

गोकुळ दूध संघाच्या ज्येष्ठ संचालकांच्या मुलाला कोरोना; जिल्ह्यात चर्चा..!

कोल्हापूर | जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या ज्येष्ठ संचालकांच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. हे संचालक राधानगरी तालुक्यातील असल्याची माहिती असून यामुळे जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आले होते. 

गोकुळ दुध संघाचे जाळे कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आहे. त्यामुळे संचालक मंडळी संपूर्ण जिल्ह्याशी जोडली गेली आहे. प्रत्येक तालुक्यातील कुणी ना कुणी संचालक मंडळात असल्याने नेमके संचालक कोण याची माहिती घेण्यासाठी सकाळपासून अनेकजण प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

Team Lokshahi News