Categories: Featured आरोग्य सामाजिक

राज्यात जिल्हानिहाय कोरोना निदान प्रयोगशाळा, तुमच्या जिल्ह्यासाठी ‘या’ ठिकाणी आहे व्यवस्था

मुंबई राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने जिल्हानिहाय आणि संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान आणि तपासणी प्रयोगशाळांची यादी जाहीर केली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी कोरोना बाधितांचं लवकर निदान करुन त्यांना विलगीकरण कक्षात नेण्याला प्राधान्य दिलं आहे. या कोरोना बाधितांचा इतर नागरिकांशी संपर्क येऊन संसर्गाची संख्या वाढू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. अगदी संशयित कोरोना रुग्णांना देखील विलगीकरण करुन त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.

जिल्हानिहाय प्रयोगशाळा याप्रमाणे

  1. मुंबई महानगर महापालिका – प्रयोगशाळा- कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई.
  2. ठाणे, रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा – ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई
  3. पालघर जिल्हा, उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा-  हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई
  4. सातारा – प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
  5. पुणे – प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे
  6. अहमदनगर व नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) – प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे
  7. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग –  प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली
  8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद – प्रयोगशाळा – डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
  9. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका)  –  प्रयोगशाळा –  भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
  10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड  –  प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
  11. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ – प्रयोगशाळा – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर
  12. नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा –  प्रयोगशाळा – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
Team Lokshahi News