Categories: बातम्या मनोरंजन

सूरांचा बादशाह हरपला : सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे कोरोनाने निधन; दीड महिन्यांची झुंज अयशस्वी

चेन्नई | आपल्या  अलौकिक आवाजाने रसिकांवर गारूड घालणारे सुप्रसिध्द पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या दीड महिन्यापासून ते कोरोनाशी लढत होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या २४ तासात त्यांची प्रकृती अधिकच नाजूक झाली होती. 

बालसुब्रमण्यम यांनी कोरोनाची लागण झाल्याचे फेसबुक पोस्टवरून आपल्या चाहत्यांना सांगितले होते. ५ ऑगस्ट रोजी  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल बालासुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती समजल्यानंतर अभिनेता कमल हसनने एमजीएम रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

बालसुब्रमण्यम यांनी तमिळ, तेलुगु, कानडी, हिंदी आणि मल्याळम सहित १६ भाषांमध्ये ४० हजारहून अधिक गाणी गायिली आहेत. ९० च्या दशकात सलमानच्या चित्रपटात बालसुब्रमण्यम यांचा आवाज असायचाच. बालसुब्रमण्यम यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.

Team Lokshahi News