Categories: आरोग्य सामाजिक

गगनबावडा तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

गगनबावडा | तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असून गगनबावडा कोविड केअर सेंटरमध्ये पहिला मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. राजाराम बाबला गिरी (वय ६१) रा. बुवाचीवाडी असे कोरोना सारी व्याधीचा बळी ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार राजाराम गिरी यांना काल (९ स्पटेंबर) कोविड केअर सेंटर मध्ये अत्यवस्थ अवस्थेत दाखल करण्यात आले. कोविड केअर सेंटर मध्ये त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यु झाला आहे. परंतु मृत्यु झाल्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात प्रशासनासह सर्वजणांना अपयश आले. मृताच्या नातेवाईकांनी अनेक ठिकाणी विचारणा करून ही नकार मिळाल्यानंतर तब्बल ४ तासानंतर कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय ट्रॅक्टरमधून त्यांचा मृतदेह गावी नेण्यात आला. यावेळी पाच जणांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

  • गगनबावडा कोविड केअर सेंटर मध्ये रूग्णांची हेऴसांड होत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.
  • एकाच डॉक्टरला चोवीस चोवीस तास ड्यूटी लावण्याचा प्रकार याठिकाणी सुरू आहे.
  • रूग्णांना पोषक आहार म्हणून दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार आहे.
  • फळे, अंडी यांचा थांगपत्ताच नसून पोषक आहाराच्या नावाखाली शासनाचा पैसा मात्र खर्ची टाकला जात असल्याची चर्चा आहे.
  • वरिष्ठ डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी कोविड केअर सेंटर कडे कधीच फिरकत नसल्याचीही तक्रार आहे.

गगनबावडा तालुक्यात सध्या २० रूग्ण पॉझिटिव्ह यातील २ जणांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ७२ रूग्णांची नोंद झाली असून १ मृत्यु आहे.

Team Lokshahi News