Categories: आरोग्य

Coronavirus। इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेली ‘ही’ माहिती नक्की जाणून घ्या!

Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!

मुंबईजगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: हैदोस घातला आहे. कोरोना व्हायरसने भारतात आधीच शिरकाव केला आहे. आता महाराष्ट्रातही कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरातच पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एक दाम्पत्य, त्यांची मुलगी नातेवाईक आणि एका चालकाचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य पातळीवर कोरोना व्हायरसबाबत जगजागृती केली जात आहे. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचेही प्रयत्न सुरु आहेत. कोरोना काय आहे, तो कसा पसरतो, कोरोनाबाबत समज-गैरसमज काय आहेत? याबाबत आयएमएने महत्त्वाची माहिती जारी केली आहे, ती पाहूया.

 • कोरोना विषाणूची साथकाय आहे कोरोना?
  – हा एक विषाणू आहे
  – तो वेगाने वाढतो
  – वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो
  आपल्या श्वसन संस्थेला बाधित करतो
 • कोरोना विषाणू दोन प्रकारे पसरतो
 • 1. रुग्णाच्या खोकल्यातून
  – रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात
  – हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात
  – या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात
  – आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यातून त्याचा संसर्ग होतो
 • 2. वस्तूच्या स्पर्शातून
  – रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात
  – त्या वस्तूंना आपल्या हातांचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात
  – त्यानंतर जर हा चेहराला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसन मार्गातून जाऊन संसर्ग होतो
 • आजाराची लक्षणे
  1. सर्दी
  2. घसा तीव्रपणे दुखणे
  3. खोकला
  4. ताप
  5. श्वास घेण्यास त्रास होणे
  6. डोकेदुखी
  7. उलट्या आणि जुलाब
 • धोकादायक लक्षणे
  1. तीव्र घसादुखी
  2. 38 अंशांपेक्षा जास्त ताप असणे
  3. धाप लागणे
  4. छातीत दुखणे
  5. खोकल्या वाटे रक्त पडणे
  6. रक्तदाब कमी होणे
  7. नखे निळसर काळी पडणे
  8. मुलांमध्ये चिडचिड आणि झोपाळूपणा वाढणे
 • जास्त धोका कोणाला?
  1. गरोदर माता
  2. उच्च रक्तदाब
  3. मधुमेह
  4. मूत्रपिंडाचे विकार
  5. कर्करोग
  6. दमा
  7. जुना व सतत बळावणारा खोकला
  8. कर्करोगाचे उपचार चालू असल्यास
 • आजाराची शंका आल्यास
  1. वेळ न दवडता मान्यताप्राप्त डॉक्टरांचा सल्ला घ्या
  2. जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन कोरोना विषाणूच्या विधानाची तपासणी करुन घ्या
  3. डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हा
  4. ऐकीव माहिती अफवांवर विश्वास ठेवू नका
  5. अशास्त्रीय उपचार, भोंदू डॉक्टरांचे उपचार घेऊ नका
 • आजार टाळण्यासाठी काय कराल?
  1. डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा
  2. गर्दीची ठिकाणे टाळा चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
  3. सॅनिटायझर किंवा साध्या साबण-पाण्याने हात वरचेवर धुवावेत
  4. खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा.
  5. टिश्यू लगेच कचरापेटीत टाकून द्यावा.
  6. खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरु नये, त्याऐवजी कोपर वाकवून ते तोंडासमोर धरावेत.
  7. ताप आणि खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा
  8. तुम्ही या विषाणूने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केला असेल किंवा जर ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे
  9. प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पर्श करु नये
  10. पूर्ण शिजवलेले शाकाहारी/मांसाहारी अन्न खावे.
  11. चिकन, मटण प्रमाणित दुकानातूनच घ्यावे
  12. तीन लिटर पाणी रोज प्यावे
  13. पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी, जागरणे टाळावीत
  14. धूम्रपान टाळावे
  15. मद्यपान टाळावे
 • कोरोना बाबतचे गैरसमज
 • 1. चिकन अंडी खाऊ नयेत
  – हे धादांत खोटे आहे
  – पूर्ण शिजवलेल्या मांसाहारातून कोरोना व्हायरस पसरु शकत नाही
  – 55 अंशांपेक्षा अधिक तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही
 • 2. चीनमधून आयात झालेल्या गोष्टी वापरु नयेत
  – आयात वस्तूमधून विषाणू पसरत नाही
  – तरीही शंका आल्यास जंतुनाशक औषधांनी त्या धुवून घ्याव्यात
  – चीनमधून आयात उपकरणे, रंग, पिचकाऱ्या, पुस्तके यातून कोरोन विषाणू पसरत नाही.
  – शंका आल्यास निर्जंतुक हॅण्डग्लोव्हज वापरावेत
 • 3. लसूण खाल्ल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग होत नाही
  – हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे.
  – यासाठी कोणतेही संशोधन अस्तित्त्वात नाही
  – अशा प्रकारची कोणतीही वनस्पती अथवा औषध सध्यातरी शास्त्रीय पद्धतीने मान्यताप्राप्त नाही
 • 4. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्ण मृत्युमुखी पडतो
  – आज देशभरात केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रात राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने, त्याचप्रमाणे आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी अगदी पहिल्या दिवसापासून हा आजार ओळखून, त्याचं निदान त्वरित करुन रुग्णाला आवश्यक असल्यास त्याला इस्पितळात भरती करण्याबद्दल मोहीम राबवली आहे.
  – विषाणूची बाधा झाली तरी रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
  – यात रुग्ण दगावण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

लक्षात ठेवा
– कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरु नका
– त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
– अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका
– कोरोना विषाणूची साथ लवकरच पूर्णपण आटोक्यात येईल

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: corona news Corona virus coronavirus Indian Medical Association