Categories: Featured

सीपीआर : अधिष्ठातापदी डॉ. चंद्रकांत मस्के यांची नियुक्ती

कोल्हापूर | राजर्षी छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. चंद्रकांत मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच प्राप्त झाला आहे. डॉ. मस्के सध्या नांदेड येथे कार्यरत आहेत. सीपीआरच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी उचलबांगली केल्यानंतर हे पद रिक्त होते. गेली दोन महिने रिक्त असलेल्या पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान प्रभारी पदाचा कार्यभार डॉ. आरती घोरपडे या सांभाळत होत्या. 

गजभिये यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर त्यांना जळगावला पाठवण्यात आले. तर त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली होती. परंतु रामानंद यांची ही नियुक्ती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर हे पद रिक्तच होते.

Team Lokshahi News