Categories: शिक्षण/करिअर

सायबर महाविद्यालयातील विद्यार्थिंनींनी पुराणकथा आणली डिजीटल स्वरूपात

कोल्हापूर।३० सप्टेंबर।सध्याचे युग हे डिजीटलचे आहे. त्यामुळे एका क्लिकवर आपल्याला हवी ती गोष्ट डिजीटलरूपात आपल्या डिवाईसवर उपलब्ध होण्यास मदत होते. परंतु अशा खुप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या अद्याप डिजीटल स्वरूपात उपलब्ध झालेल्या नाहीत. यात बहुतांशी पुराणकालीन कथांचा खुप मोठा ठेवा अजूनही काही ठराविक मर्यादेच्या पलीकडे डिजीटल स्वरूपात समोर आलेला नाही. हीच बाब ध्यानात घेत पुराणकालीन कथा डिजीटल स्वरूपात आणण्याचा प्रयत्न सायबर महाविद्यालयातील मल्टीमिडीयाच्या तृतीय वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी केला आहे. 

सायबर संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल कोर्सेस फॉर वुमेनस् अंतर्गत मल्टीमिडीयाच्या विद्यार्थिनींनी केलेल्या या अभिनव प्रयोगात ‘खुलभर दुधाची गोष्ट’ डिजीटल स्वरूपात सादर केली आहे. यातील कथा एका हिंदू राजाची असून महाशिवरात्रीवर आधारलेली आहे. यातून देण्यात आलेला संदेश अतिशय महत्वाचा आहे. हा संदेश समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनवलेला ३ मिनीटांचा व्हिडीओ मात्र आपणास पहावा लागणार आहे. 

यामध्ये डिजीटल पेंटीग आणि स्टोरी बोर्डींगची जबाबदारी रसिका धुपकर, अर्पिता संत, ऐश्वर्या शिंदे, जागृती खराडे या विद्यार्थिनीनी पार पाडली आहे. स्क्रीप्ट रायटिंग शिवानी फडतरे, प्रतिक्षा मानगावे, अंकिता जमदाडे, मिनल भालकर यांनी केली आहे. तर साऊंड एडिटींगची जबाबदारी आर्या हळदणकर, मानसी मिरजकर, श्रेया कुलकर्णी, मयुरी भोईटे यांनी पार पाडली आहे. या कथेला व्हाईस ओवर निलेश रावत यांनी दिला आहे. या सर्वांच्या मेहनतीतून ही पुराणकथा डिजीटल रूपात आकाराला आली आहे. 

विद्यार्थिनींनी केलेल्या या प्रयोगासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रा.रघुनाथ टोपकर, प्रा.भक्ती शेंडगे, प्रा.सुमीत कदम, प्रा.प्रतीक जाधव, तसेच संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. रघुनाथ शिंदे यांचे सहकार्य लाभले आहे. 

Team Lokshahi News