मुंबई | ‘प्रभू श्रीरामा’ च्या नावे चलनी नोटा असल्याचे सांगितल्यास तुमचा विश्वास बसेल का? अहो बसायलाच हवा. नेदरलॅंड स्थित महर्षी महेश योगी यांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे चलनच चक्क ‘राम मुद्रा’ आहे. संस्थेच्या प्रत्येक आश्रमात हे चलन वापरण्यात येते. हे चलन ऑक्टोबर 2002 मध्ये महर्षींच्या ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस या संस्थेने जारी केले होते.
मूळचे छत्तीसगढचे रहिवासी असणाऱ्या महर्षीं महेश योगी यांनी आपल्या अवतारकाळात जगभरात अनेक आश्रमांची स्थापना केली. आपला अवतारकाळ संपविण्याच्या आधी त्यांनी एक मुद्रा काढली होती. नेदरलॅंडसह सहयोगी संस्थेत वापरल्या जाणाऱ्या या मुद्रेवर रामाचा फोटो बरोबरच ‘विश्व शांती राष्ट्र’ असे लिहिलेले आहे. तर मागच्या बाजूने कल्पवृक्ष आणि गायीचे चित्र, तसेच राम राज्य मुद्रा असे लिहिले आहे. या मुद्रेमध्ये चमकदार रंगाच्या एक, पाच आणि दहा पाचशेच्या नोटा उपलब्ध आहेत. हे चलन ऑक्टोबर 2002 मध्ये महर्षींच्या ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस या संस्थेने जारी केले होते. डच सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार रामाच्या प्रतिमेचा वापर करणे कायद्याचे उल्लंघन नाही. परंतु त्याच्या मर्यादित वापरासच परवानगी देण्यात आली आहे.