Categories: अध्यात्म

अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्या थेट घरबसल्या; अगदी गाभाऱ्यातून घेतल्यासारखे..!

पुणे | पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आज अंगारकी चतुर्थी निमित्त अनेक भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. कोविडचे निर्बंध असल्याने, मनात इच्छा असूनही अनेक भक्तांना दर्शन घेता आलेले नाही. पण समस्त गणेशभक्तांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. आणि ती म्हणजे समस्त भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन अगदी गाभाऱ्यात जाऊन घेता येणार आहे, हो अगदी थेट गाभाऱ्यात…

भक्तांच्या भावना लक्षात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई देवस्थानने एक आगळीवेगळी कल्पना राबवली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज श्रीमंत दगडूशेठ गणपती थेट आपल्या घरामध्ये अवतणार आहेत. अंगारकी चतुर्थीला मंदिराच्या गाभा-यामध्ये विशेष आरास केली जाते. आजवर, ही आरास काचेतूनच पहायला मिळायची. परंतु मॅटरपोर्ट या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता गाभा-यातील आरास थेट पाहता येईल. इतकेच नाही, तर विविध बाजूंनी मूर्ती व आरास बघताना, आपण थेट गाभा-यातच आहोत, असे वाटेल. भक्ती आणि तंत्रज्ञानाच्या मिलनातून येणारा हा अनुभव घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा..!
my.matterport.com

My Matterport

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: दगडूशेठ गणपती दर्शन