Categories: Featured आरोग्य सामाजिक

मृत कोरोना बाधितांच्या कुटूंबियाना मिळणार ‘इतकी’ मदत; मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवीदिल्ली।  कोरोना बाधितांच्या मृत्युसंदर्भात मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मृतांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. जगभरासह भारतातही मोठ्या (Death Due To Corona Virus) प्रमाणावर पसरलेल्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी सरकार शक्यते सर्व   प्रयत्न करत आहे. मोदी सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.

भारतात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी १२मार्चला कर्नाटकात कोरोनामुळे ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर, शुक्रवारी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात ६८वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेल्या तिच्या मुलामुळे कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांचा मुलगा ५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान स्वित्झर्लंड आणि इटलीच्या दौऱ्यावर होता. सध्या या मुलावर उपचार सुरु आहेत.

Team Lokshahi News