मुंबई | व्हाट्स अॅप चॅटवरून माल है क्या असं विचारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला ‘माल’ म्हणजे ड्रग्ज नव्हे हे सिद्ध करावे लागेल, तरच तिची या प्रकरणातून सुटका होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील उज्जवल निकम यांनी व्यक्त केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना निकम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
व्हॉटअप चॅटिंग हा डॉक्युमेंटरी पुरावा आहे. फिर्यादीला हे सिद्ध करावे लागेल की ते ड्रग्जचे सेवन करत नव्हते. माल है क्या? म्हणजे नेमकं काय? माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल. ज्या ग्रुपवर दीपिकाने ही विचारणा केली होती, त्या ग्रुपची अॅडमिन दीपिका पदुकोण असल्याचेही तपासात समोर आले आहे.
रिया चक्रवर्तीची मॅनेजर ही ड्रग्ज पेडलर असल्याने व्हॉट्सअप चॅटिंगवरून पुढील काळात दीपिकाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. परंतु NTBS कायद्यानुसार ड्रग्सचे सेवन करणं हा गंभीर गुन्हा आहे. यासाठी १ वर्षाची शिक्षा आणि २० हजार रुपये दंड होऊ शकतो. परंतु, जर या तिन्ही अभिनेत्रींनी जर चुकीने ड्रॅग्ज सेवन झाल्याची कबुली दिली तर ते शिक्षेपासून वाचू शकतात, असंही निकम म्हणाले.
दरम्यान, एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी आलेल्या दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरने ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार केला आहे. मात्र दीपिकाने ड्रग्जबाबत चॅट केल्याची कबुली दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच, श्रद्धा कपूरने ‘छिछोरे’च्या पार्टीत भाग घेतल्याचं चौकशीत मान्य केलं आहे.