नवी दिल्ली। दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. (Delhi Vidhansabha Election Result) अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेस दिल्लीत सर्वाधिक जागा हरणारा मोठा पक्ष ठरला आहे.
दिल्ली निकाल – आता पर्यंतचे कल
1) दिल्लीकरांची पुन्हा केजरीवालांना साथ, ५६ जागांवर आघाडी
2) अरविंद केजरीवालांची हॅटट्रिक जवळपास निश्चित
3) दिल्लीवर तिसऱ्यांदा ‘आप’चा झेंडा
4) भाजपला १५ ते २० दरम्यानच जागा मिळण्याची चिन्हं
5) काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ