Categories: कृषी प्रशासकीय

कृषि विभाग : अस्थायी पदे ‘या’ तारखेपर्यंत चालू ठेवणेबाबतचा शासननिर्णय पहा..!

GR – कृषि विभागातील कृषि आयुक्तालयांतर्गत अस्थायी पदे चालू ठेवणेबाबत.

सन 2020-21 मध्ये कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाअंतर्गत अस्थायी पदे दि. 31/08/2020 पर्यंत चालू ठेवण्यास उपरोक्त संदर्भ क्र.2 अन्वये मान्यता देण्यात आली होती. आता, संदभ क्र.4 अन्वये अस्थायी पदे सन 2020-21 मध्ये दि.01/09/2020 पासून पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत कृषि आयुक्तालयाव्दारे विनंती करण्यात आली आहे. अनुषंगाने 13439 अस्थायी पदांना वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.3 येथील शासनिर्णयान्वये सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समन्वय समितीची मान्यता घेण्याच्या अधीन राहून प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार दि.01/09/2020 ते दि.28/02/2021 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. 
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202009101616358101 असा आहे.

GR – विशेष घटक योजनेखाली खते, बी-बीयाणे इ.साठी अर्थसहाय्य या योजनेतील 289 अस्थायी पदे पुढे सुरु ठेवण्यास मान्यतेबाबत

कृषि विभागातील, 800 इतर खर्च, (00) (02) विशेष घटक योजना, विशेष घटक योजनेखाली खते, बी-बीयाणे इ. साठी अर्थसहाय्य या योजनेतील 289 अस्थायी पदांना दिनांक 01/09/2020 ते दिनांक 28/02/2021 पर्यंत आकृतीबंधात समाविष्ट असल्याचे अधीन राहून पुढे सुरु ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. 
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202009101609321201 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Team Lokshahi News