Categories: कृषी

देशातील ८ कोटी ६७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा; ‘या’ लिंकवर जाऊन पहा गावनिहाय यादी

नवीदिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यापोटी केंद्र सरकारने ९ ऑगस्ट रोजी १७ हजार कोटी रूपयांचे वितरण केले आहे. याचा लाभ देशातील तब्बल साडेआठ कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळाला असून थेट लाभांतरणाच्या माध्यमातून हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे त्यांची गावनिहाय यादीही पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. 

शेतकऱ्यांनी ही यादी पाहण्यासाठी https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx लिंकवर जाऊन समोर येणाऱ्या पर्यायानुसार आपल्या राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची आणि गावाची निवड करणे गरजेचे आहे. हे सर्व ऑप्शन भरल्यानंतर Gate Report वर क्लिक केल्यानंतर प्रत्येक गावनिहाय शेतकऱ्यांना यादी पाहता येणार आहे. गावनिहाय यादीबरोबरच शेतकऱ्याला त्याच्या वैयक्तिक खात्याची माहिती हवी असल्यास https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या लिंकवर जाऊन आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक अथवा बॅंकेतील खाते क्रमांकाच्या आधारे आपला तपशील पाहता येणार आहे. 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांच्यासाठी मोदी सरकारकडून सुरू करण्यात आलेली महत्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत केली जात आहे. ऑगस्ट २०२० ते नोव्हेंबर २०२० च्या सहाव्या हप्त्यापोटी देशातील ८ कोटी ६७ लाख ३३ हजार ९५६ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. तर एप्रिल २०२० ते जुलै २०२० च्या पाचव्या हप्त्याचा लाभ १० कोटी ४२ लाख ६ हजार ७४१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना