Categories: Featured

शरद पवारांचा नाद केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना करावे लागतेय ‘हे’ काम! वाचा सविस्तर!

नागपूर।४ जानेवारी। राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने आता त्यांच्यावर कोणती वेळ आलीय. हे दर्शवणारा एक मेसेज सोशल मिडीयावर सध्या चांगलाच धुमाकुळ घालतोय. व्हाट्सअपवर फिरणाऱ्या या मेसेजमुळे देवेंद्र फडणवीस चांगलेच ट्रोल होत असून नेटकऱ्यांकडून हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड केला जात आहे. 

सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्ये करून राजकीय वातावरण चांगलेच तापवले होते. विधानसभा निवडणुकीत यावर आणखी जोर देत फडणवीस यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवल्याचे संपूर्ण महाराष्ट्राला पहायला मिळाले. परंतु राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोणतीही भडक प्रतिक्रिया न देता आपल्या अनुभवातून आणि थेट कृतीतून फडणवीसांना धडा शिकवत सत्तेतून हद्दपार केले.  त्यामुळे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन अशी ओरड करणाऱ्या फडणवीसांना मी माघारी नागपूरला पुन्हा येईन असे म्हणण्याची वेळ आल्याचे दिसून आले.

Viral – पवार साहेबांचा नाद केल्यावर ग्रामपंचायत चा प्रचार करावा लागतो😅😅😜🤪🤪

आता नागपूरला परतलेल्या फडणवीसांवर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली असून त्यांना ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे. त्यासाठी त्यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात असून फडणवीसांची ही प्रगती केवळ शरद पवारांचा नाद केल्यामुळे झाल्याचे सोशल मिडीयावर चर्चिले जात आहे. 

Team Lokshahi News