Categories: अर्थ/उद्योग

‘डी मार्ट’ बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

 • डी मार्ट हे नाव कुठल्याही विदेशी कंपनीचे नसून एका भारतीयाने या सुपरमार्केट चेनची सुरवात केली आहे. ‘डी’ हे आडनावावरून वापरण्यात येत असून याचे मालक शेअरबाजारातील प्रसिध्द व्यक्तीमत्व अर्थात ‘राधाकृष्णन दमाणी’ हे आहेत. (D-Mart)
 • मुंबईच्या स्टॉक एक्सचेंज मध्ये कधी काळी एक स्टॉक ब्रोकर म्हणून कार्यरत असलेल्या दमाणी यांनी भारतात नुकतीच रूजू घातलेली रिटेल संस्कृती ओळखून या क्षेत्रात प्रवेश केला. सुरवातीला स्वतंत्र आऊटलेट उघडण्यापासून सूरवात न करता त्यांनी नवी मुंबईतील ‘अपना बाजार’चं दुकान विकत घेतलं ते प्रामाणिकपणे चालवून पाहिलं. ते चालत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ‘डी’ म्हणजेच ‘दमाणी’ या नावाने पहिलं डीमार्ट सन २००२ मध्ये पवई येथे सूरू केलं.

 सर्वसामान्य ग्राहकांना नजरेसमोर ठेवून भारतभरात सुरू झालेल्या डी-मार्ट या सुपरमार्केट चेनची लोकांमधली लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. दर महिन्याचा घरखर्च आणि पैशांची जुळवाजुळव करताना सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची होणारी कसरत नेहमीचीच असते. दररोजच किराणा साहित्य, घरगुती स्वच्छतेच्या वस्तू, भांडे आणि ऋतुमानानुसार लागणाऱ्या तसेच सणासुदीला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करताना सर्वसामान्यांची नेहमीच कसरत होते. सर्वसामान्यांची होणारी ही कसरत ओळखूनच त्यांना अगदी वाजवी तसेच इतर ठिकाणच्या मार्केट रेट पेक्षा कमी किमंतीत वस्तू उपलब्ध करून देण्याची संकल्पना डी-मार्टने पुढे आणली. 

अल्पावधीतच  डी – मार्टमुळे सर्वसामान्यांची मानसिकताच बदलली. सिझनल आणि आवश्यक वस्तूंवर मिळणारी भरघोस सूट यामुळे दुय्यम गरजांची पूर्तता करणे देखील यामुळे शक्य होते. परिणामी लोकांची वाढती गर्दी या सुपरमार्केट चेनमध्ये पहायला मिळते. परंतु डी- मार्ट ग्राहकांना सर्वात स्वस्त कसं काय देतं? हे जाणून घेण्यासाठी त्यांची कार्यपध्दती कशी राबवली जाते हे पाहणे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊयात या डी- मार्टच्या कार्यप्रणाली विषय…

डी मार्ट ही  सुपर मार्केटची परदेशी चेन नसून याचे मालक आणि संस्थापक हे एक भारतीय आहेत. शेअरबाजारात प्रसिध्द असणाऱ्या या व्यक्तीचं नाव राधाकृष्णन दमाणी असं आहे. यांच्या व्यापार ज्ञानाची शेअर बाजार तसेच व्यापारउद्योगात वाखाणणी केली जाते . उदाहरणादाखल सांगायचं झालं तर १९८० च्या दशकात जेव्हा जिलेट ही कंपनी फारशी कोणाला माहिती नव्हती तेव्हा त्यांनी काळाची पाऊले आधीच ओळखली आणि या कंपनीचे भरपूर शेअर्स घेतले आणि त्याहून भरपूर नफा ही  कमावला . त्यांचं हे शेअर-मार्केटचं नॉलेज त्यांना सुपरमार्केटच्या प्रवासात ” बाकी कंपनींपेक्षा जास्त चाणाक्ष, धूर्त आणि काळाच्या पुढे बनवतं”

डी मार्टची अजून एक जमेची बाजू ती म्हणजे, मालक मॉडेलवर काम करतात बाकी प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे स्वस्त आणि सुटसुटीत ” रेंटल मॉडेल वर ” काम करत नाहीत. डी – मार्टचे मुंबई, पुणे , कर्नाटक आणि तेलंगणा मध्ये स्टोअर्स आहेत. जिथली जागा आणि बांधकाम दोन्हीचे मालकी हक्क डी -मार्ट कडे आहे . त्यामुळे डी -मार्ट ची आपली स्वतःची भरपूर मोठी पार्किंग त्यांच्या स्टोअर जवळ असते. परंतु मुंबई सारख्या शहरात जेथे लोक स्वतःच्या वाहनांपेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात तेथे मात्र या पार्किंग मध्ये कपात केली जाते. स्वतःची जागा, इमारत आणि पार्किंग असूनही कंपनीला हे मॉडेल परवडते कारण त्यांची बहुतांशी स्टोअर्स ही शहराच्या बाहेर असतात.

डीमार्ट ची संकल्पना ही भारतीय मानसिकतेला समोर ठेवून बनविलेल्या व्यापार तंत्राभोवती फिरते. कारण दमाणी यांना भारतीय मध्यमवर्गीयांच्या गरजा आणि त्यांच्यावरील निर्बंध या दोन्हीची उत्तम जाण आहे.  ते व्यापारात दोन गोष्टींना खूप महत्व देतात ते म्हणजे त्यांच्याकडे येणारे ग्राहक कायम ठेवणं म्हणजेच ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली तर चालेल पण घट होता कामा नये आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या ग्राहकाने नेहमी जास्तीत जास्त माल खरेदी करावा.

आता बाब येते मालाच्या दर्जाची, माल  कमी भावात मिळतो म्हणून त्याचा दर्जा यथा-तथाच असतो का? तर मुळीच नाही. डस्टबिन बॅग्स, टॉयलेट पेपररोल किंवा टिशु पेपर या गोष्टी छोट्या पण नेहमी लागणाऱ्या असतात आणि म्हणूनच या गोष्टींचा दर्जा डी मार्ट मध्ये उत्तम आणि किंमतीही किफायतशीर असतात. नेहमी लागणाऱ्या वस्तू लोकांना एकाच ठिकाणावरून खरेदी करायला आवडतात. अशा प्रकारे, मध्यम वर्ग, जो आपल्या देशात सगळ्यात जास्त आहे त्यांच्या गरजांचं भान डी -मार्ट ठेवतं. त्यामुळे दिवसेंदिवस डीमार्टच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होताना दिसते. 

डीमार्टची कार्यप्रणाली आणि स्टाफ बद्दल थोडसं – 

इथला प्रत्येक कर्मचारी त्याचं काम उत्तम रित्या जाणतो. प्रत्येक एरियातील प्रत्येक सेक्शन हा एक नेमून दिलेली व्यक्ती हाताळत असते. जीला त्या विशिष्ठ भागातील  ग्राहकांचं उत्तम ज्ञान असतं आणि हीच व्यक्ती तेथे पुरवल्या जाणाऱ्या मालाची उलाढाल पाहत असते.  भरपूर बिलिंग काउंटर, तेथील जबाबदार स्टाफ आणि किती माल घेतला आहे त्यावर ठरणारे बिलिंग कॉउंटर नंबर यामुळे बिलिंग च्या जागी देखील खूप रांग लागत नाही.

डीमार्ट ने मध्यमवर्गीयांची गरज ओळखून आपला स्वतःचाही एक ब्रँड सुरु केला आहे. ज्याचं  नाव आहे ‘D -homes‘ असं आहे. डी मार्ट इलेक्ट्रॉनिक्स, भाज्या आणि फळे, आणि होम -डेकोर या गोष्टींची  विक्री न करूट आपला वेगळेपण जपतं. डी मार्ट मधला “कपड्यांचा विभाग” हा सर्वात लोकप्रिय असून किफायतशीर भावात आपल्या मनासारखी फॅशन तुम्हाला येथे करता येते आणि म्हणूनच येथील सप्लायरचे निकष खूप कडक असतात.

डी-मार्ट यशस्वी सुपर मार्केटचेन असण्याचं शेवटचं आणि महत्वाचं कारण म्हणजे येथे सप्लायर ना २ आठवड्याच्या आत पेमेंट केलं जातं. उलाढाली साठी लगोलग पैसे उपलब्ध होत असल्याने सप्लायर केवळ ७-१०% नफ्याचे प्रमाण ठेवून यांना डीमार्टला माल पुरवतात.

देशभरात ‘या’ ठिकाणी सुरू आहे ‘डीमार्ट’

 • महाराष्ट्र – अमरावती, औरंगाबाद, इचलकरंजी, जयसिंगपूर, जळगाव, जालना, कराड, कोल्हापूर, लातूर, मिरज, मुंबई, नागपूर, नांदेड, नवी मुंबई, उस्मानाबाद, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे
 • गुजरात – अहमदाबाद, आनंद, बडोदा, भुज, गांधीनगर, गांधीधाम, मेहसाणा, नाडियाद, राजकोट, सूरत, वलसाड, वापी
 • दमण – दमन
 • तेलंगाना – हैदराबाद, करीमनगर, खम्मम, वारंगल
 • आंध्र प्रदेश – इलुरू, गुंटूर, काकीनाडा, कुर्नूल, नेल्लोर, ओंगोले, राजामुंधरी, तिरुपती, तुनी, विजयवाडा, विशाखापट्टणम
 • कर्नाटक – बेंगलुरू, बेळगाव
 • मध्य प्रदेश – भोपाल, देवास, इंदूर, रतलाम, उज्जैन
 • छत्तीसगड – भिलाई, रायपूर
 • एनसीआर – गाझियाबाद
 • तामिळनाडू – चेन्नई, कोयंबटूर, सालेम, त्रिची
 • पंजाब – अमृतसर, जालंधर, झिरकपूर
 • राजस्थान – अजमेर, भीलवाडा, जयपूर
Team Lokshahi News