Categories: कृषी बातम्या

PM किसान योजनेचा लाभ घेताय? मग ही बातमी नक्की वाचा..!

नवी दिल्ली | पंतप्रधान सन्मान निधी योजना देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रसिध्द असणारी महत्वाची योजना आहे. परंतु या योजनेत बऱ्याच राज्यांमध्ये घोटाळा झाल्याच्या घटना उघड झाल्याने आता केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून ५ टक्के लाभार्थ्यांचे फिजीकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिलेत. यामुळे सरकारला विश्वास आहे की, जे या योजनेचा गैरउपयोग घेत आहेत त्यांची ओळख पटेल आणि अशांवर तात्काळ कारवाई देखील करता येईल. तामिळनाडू, उत्तरप्रदेश, आसाम सारख्या राज्यांमध्ये बोगस लाभार्थी दाखवून घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

सध्या तामिळनाडू राज्याचा विचार करता जवळपास ५ लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवले गेले आहेत. यातून ११० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे दिसत असून याचा तपास आता सीबीआय करत आहे. ज्या अपात्र लोकांनी हा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून या पैशाची वसूली केली जात आहे. आसाम राज्यात देखील ९ लाखांच्या आसपास बोगस लाभार्थी सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

सुरवातीच्या काळात PM Kisan योजनेतील लाभार्थ्यांचे रॅंडम सॅम्पलिंग पध्दतीने व्हेरिफिकेशन केले जात होते. परंतु केंद्र सरकारने आता नवीन फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिले आहेत. फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश राज्यसरकारना देण्यात आलेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या घरी जाऊन खरोखर योग्य व्यक्तीपर्यंत हा लाभ पोहचतोय का? अर्जात नमूद केलेला लाभार्थी आणि त्याने दिलेली माहिती बरोबर आहे का हे देखील यामध्ये पाहिले जाणार आहे. तसेच पीएम किसान योजनेचे कॅग कडून ऑडिट केले जाणार असून प्रत्येक राज्यांकडून वितरित करण्यात आलेल्या खात्यांची आणि रक्कमांची माहिती मागवण्यात आली आहे. 

असा करा PM Kisan योजनेसाठी अर्ज –
PM किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थात www.pmkisan.gov.in/ जावे. याठिकाणी होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल. यात Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅप्चा कोड यादी गोष्टी भरून आपली नोंदणी करू शकतात. किंवा स्वतः भरलेल्या खात्याचा तपशिल जाणून घेऊ शकतात. 
आपले नाव सुचीमध्ये आहे का नाही हे पाहण्याठी  लाभार्थी यादी म्हणजेच Beneficiary list वर क्लिक करावे.  यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावाचे नाव भरुन तपासू शकता.

यांना मिळत नाही पीएम किसान योजनेचा लाभ – 
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींच्या नावावर शेत जमीन असावी, पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरी किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर या योजनेसाठी पात्र नाही. यासह जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तर तेही या योजनेसाठी पात्र नसतील. जर अर्ज करणारा व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता, वकील, चार्टट अकांउंटट असेल तर तोही या योजनेस पात्र नाही. 

Team Lokshahi News