Categories: Featured आरोग्य

रंकाळा टॉवर परिसरातील डॉक्टर कोरोनाबाधित, परिसर लॉक!

कोल्हापूर | कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये रंकाळा टॉवर परिसरातील एका प्रसिध्द डॉक्टरलाच कोरोना झाल्याने रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ दरम्यानचा मुख्य रस्ता व त्याला जोडणारे इतर रस्ते सीमाबंद केलेत. सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिलेत.

  • रंकाळा परिसरातील या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातुन आढळून आले आहे. सदर डॉक्टर सीपीआर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. त्यांचे रंकाळा परिसरात रुग्णालयही आहे. त्यांच्या संपर्कातील २० जणांना तपासणीसाठी नेण्यात आले आहे. तसेच सावित्रीबाई रुग्णालयातील १२ जणांना क्वारंटाईन केले आहे.

या आदेशात म्हटले आहे, सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोराना विषाणूचे संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय-योजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रूग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होते.

भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम – १८९७ व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडील दिशा निर्देशानुसार जिल्ह्यातील कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ दरम्यानचा मुख्य रस्ता व त्याला जोडणारे इतर रस्ते नकाशात दर्शविल्यानुसार या भागातील क्षेत्र उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर उपविभाग कोल्हापूर यांच्या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे व या क्षेत्राच्या रस्त्यांच्या सीमा सिलबंद करण्यात येत आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: docter corona positive