Categories: आरोग्य

Corona Virus: मृत्यू झालेल्या पहिल्या भारतीयावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच आता संसर्ग

बेंगळूरू भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या डॉक्टरवर सध्या त्यांच्याच घरी उपचार सुरु असून त्यांना कुटुंबियांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. आज त्यांना आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कलबुर्गीच्या उपायुक्तांनी दिली आहे. 

कर्नाटकातील कलबुर्गी येथे ७६ वर्षांच्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच आता संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या कर्नाटकामध्ये कोरोनाची लागण झाल्याची दोन नवीन प्रकरणं समोर आली आहेत. त्यामध्ये ६३ वर्षांच्या डॉक्टराचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना विषाणू वेगाने पसरत असल्याने कर्नाटक सरकारने मॉल, चित्रपटगृह, उद्याने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

Team Lokshahi News