Categories: अर्थ/उद्योग कृषी

शेतकरी बंधूनो सरकारच्या ‘या’ योजनेतून आपला पैसा करा दुप्पट; 1000 रुपयांपासून करु शकता गुंतवणूक

नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना गुंतवणूकीसाठी एक चांगली योजना आणली आहे. सरकारच्या या योजनेत पैसा गुंतवल्यानंतर शेतकऱ्यांना दुप्पट रक्कमेचा लाभ मिळतो. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) नावाने ही योजना सुरू आहे. गुंतवणुकीची सुरुवात १००० रुपयांपासूनही करता येते. या योजनेत दीर्घ काळासाठी देखील गुंतवणूक करायची असली तरी देखील त्यांच्यासाठी ही योजना सर्वोत्तम आहे. सरकारची ही योजना देशातील सर्व पोस्ट कार्यालयात उपलब्ध असल्याने अगदी गाव पातळीवरच या सुविधेचा लाभ घेता येतो.

 • पोस्ट ऑफिसच्या या अधिकृत लिंकवर जाऊन जाणून घ्या विविध योजनांची सविस्तर माहिती. www.indiapost.gov.in

किसान विकास पत्र योजनेच्या सुरक्षेची हमी केंद्र सरकार घेते, यामुळे आपला पैसा बुडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. या योजनेची मॅच्युरिटी १२४ महिने म्हणजेच १० वर्ष ४ महिने अशी आहे. यात गुंतवणुकीची सुरुवात आपण एक हजार रुपयांपासून करु शकतो. एक हजार ते आपली इच्छा असेपर्यंतची रक्कम आपण या योजनेत गुंतवू शकतो. दरम्यान ग्राहकांना आपला पैसा बुडण्याची भिती असते. कारण बाजारात अशा अनेक गुंतवणुकीच्या योजना आहेत ज्यातून ग्राहकांची फसवणूक होत असते. परंतु किसान विकास पत्र योजनेच्या सुरक्षेची हमी केंद्र सरकार घेते, यामुळे आपला पैसा बुडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.

दरम्यान, ही योजना वन टाईम इन्वेस्टमेंट योजना आहे. याची सुरुवात १००० पासून होते. त्यानंतर यात ५ हजार, १० हजार पासून ते ५० हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाते. किसान विकास पत्र हे दोन प्रकारचे असते. सिंगल होल्डर सर्टिफिकेट अडल्ट  किंवा माइनर पद्धतीने सुरु करु शकतात. तर जॉईंट होल्डर दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात दोन्ही खातेधारकांना मॅच्युरिटीवर बेनिफिट मिळते. दुसऱ्या प्रकारातील कोणत्यातरी एकाला मॅच्युरिटीवर पुर्ण पैसे मिळतात.

किसान विकास पत्रावर आता ६.९ टक्के व्याज मिळते. सध्या दिले जाणारे व्याज हे १२४ महिन्याच्या हिशोबानुसार ही रक्कम दुप्पट होत असते. टपाल कार्यालयाची ही योजना असल्याने व्याज दराचे कॅलक्युलेशन हे तिमाही असते. म्हणजेच तीन महिन्यावर व्याजदर निश्चित केले जाते. मार्चपर्यंतच्या तिमाहीत व्याज दर ७.७  टक्के होते, त्यावेळी ११२ महिन्यात दुप्पट होत होते. डिसेंबर २०१९ तिमाहीत व्याजदर ७.७ टक्के होते.

किसान विकास पत्रात गुंतवणूक करण्यासाठी एक ओळखपत्र, रहिवाशी दाखला, आधार कार्ड, आणि पॅन कार्ड या कागदपत्राची आवश्यकता असते. याशिवाय मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट या कागदपत्रांच्या मदतीने आपण या योजनेत गुंतवणूक करु शकता. जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन एक अर्ज भरून या योजनेत गुंतवणुक करता येते. प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आपले किसान विकास पत्र खाते उघडले जाते. या अर्जात खातेधारकांचे नाव, मॅच्युरिटी तारीख यासह इतर माहिती द्यावे लागते.

 • महत्वाचे –
  • किसान विकास पत्रात गुंतवणूक केल्यास आयकरमध्ये कोणतीही सवलत मिळत नाही.
  • रिटर्न पूर्णपणे टॅक्सेबल आहे.
  • टीडीएस कापल्या जात नाही.
  • किसान विकास पत्राचा वापर कर्जासाठी सिक्युरिटी कागदपत्राच्या रुपात केला जाऊ शकतो.
  • किसान विकास पत्राच्या आधारे मिळणाऱ्या कर्जावर व्याज कमी लागते.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: how to calculate income tax on kisan vikas patra how to encash kisan vikas patra after maturity kisan vikas patra 2020 kisan vikas patra calculator 2020 kisan vikas patra in hindi kisan vikas patra online purchase sbi kisan vikas patra rate of interest 2020 kisan vikas patra withdrawal rules post office kisan vikas patra scheme किसान विकास पत्र किसान विकास पत्र मागे घेण्याचे नियम किसान विकास पत्र व्याजाचा २०२० दर पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना