Categories: कृषी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना : अनुदान, लाभार्थी पात्रता, अर्ज कोठे करायचा याविषयी संपूर्ण माहिती एका क्लिकवर

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबवली जात आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असून ही १०० टक्के राज्य पुरस्कृत आहे.

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन २०२०-२१ मध्ये राबविण्यासाठी या योजनेचा शासन निर्णय प्राप्त होताच योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल.

उद्देश : राज्यातील अनुसुचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे.
योजनेचीव्याप्ती : राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व ३४ जिल्हयांमध्ये सदर योजना राबविण्यात येत आहे.

योजनेतून दिले जाणारे अनुदान
१) नवीन विहीर –  रु.२५००००/-
२) जुनी विहीर दुरुस्ती –  रु.५००००/-
३) इनवेल बोअरींग – रु.२००००/-
४) पंप संच (डिझेल/विद्युत)- रु.२००००/-
५) वीज जोडणी आकार – रु.१००००/-
६) शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण – रु.१०००००/-
७) सुक्ष्म सिंचन संच – ठिबक सिंचन संच रु.५००००/-,  तुषार सिंचन संच – रु.२५०००/-

सदर योजनेंतर्गत वरील ७ बाबींचा समावेश असून लाभ पॅकेज स्वरुपात देण्यात येईल. खालील ३ पैकी कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थीस देय आहे.
१. नवीन विहीर पॅकेज – नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.
२. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज – जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.
३. शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज – शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व पंप संच. 

ज्या शेतक-यांनी यापुर्वीच योजनेतुन/स्वखर्चातून विहीर घेतली असेल त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच यासाठी अनुदान अनुज्ञेय आहे. वरील घटकांपैकी काही घटक शेतकरी यांचेकडे उपलब्ध असतील तर उर्वरीत आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी खालील घटकांची निवड करावी.
वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व पंप संच

पुर्वसंमती – पुर्वसंमती मिळाल्यानंतरच शेतकरी यांनी वरील बाबींची अंमलबजावणी करावयाची आहे.

लाभार्थी पात्रता –
१. लाभार्थी अनुसुचित जाती / नवबौध्द  प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
२. शेतकरी यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक  उत्पन्न रु.१५००००/- पेक्षा जास्त नसावे.
३. नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकरी यांचेकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच यापुर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा.
४. लाभार्थ्याच्या ७/१२ वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास नवीन विहीर लाभ घेता येणार नाही.
५. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून ५०० फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी.
६. नवीन विहीर व्यतिरिक्त अन्य बाबींचा लाभ घेण्यासाठी किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –
१. ७/१२
२. ८ अ
३. आधार कार्ड
४. तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला
५. नवीन विहीरीचे बाबतीत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला
६. जात प्रमाणपत्र

अर्ज कोठे करावा – अर्ज https://agriwell.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन करावा. सदर सुविधा साधारणपणे प्रत्येक वर्षी ऑगस्ट/सप्टेंबर मध्ये एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येते.

नवीन विहीर – पुर्व संमती व कार्यारंभ आदेश – नवीन विहीरीसाठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कृषि अधिकारी पंचायत समिती हे कार्यारंभ आदेश देतील. त्यानंतर ३० दिवसाचे आत काम सुरु करावे.
शेततळे अस्तरीकरण – शेततळे अस्तरीकरणासाठी ५०० मायक्रॉन जाडीची प्लास्टिक रिईनफोर्स्ड एचडीपीई जिओ मेंबरेन फिल्म (IS:15351:2015 Type II) वापरावी.
ठिबक सिंचन संच – प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान व या योजनेतुन ३५ टक्के (रु.५००००/- मर्यादेत) अनुदान असे ९० टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहील.
तुषार सिंचन संच – प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान व या योजनेतुन ३५ टक्के (रु.२५०००/-  मर्यादेत) अनुदान असे ९० टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहील.
पंपसंच – पुर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी एक महिन्याच्या आत पंप संच बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावा.
अनुदान – देय अनुदान इलेक्ट्रानिक फंड ट्रान्सफरव्दारे लाभार्थींचे आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी – कृषि अधिकारी (पंचायत समिती), गटविकास अधिकारी (पंचायत समिती) व कृषि विकास अधिकारी (जिल्हापरिषद) यांच्याशी संपर्क साधावा.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: dr.babasaheb ambedkar krishi swavalamban yojana application dr.babasaheb ambedkar krishi swavalamban yojana online application कृषि यंत्रीकरण ऋण योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना नवीन विहीर अनुदान योजना 2020 बिरसा मुंडा कृषि स्वावलंबन योजना मुख्यमंत्री कृषि पंप अनुदान योजना विशेष घटक योजना विहीर विहीर दुरुस्ती योजना 2020 विहीर योजना यादी शेती योजना महाराष्ट्र 2020