नवी दिल्ली | ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर पीएम किसान योजनेचा सातवा हप्ता मिळेल अशी देशभरातील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. आत्तापर्यंत देशातील ११ कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून शेतकऱ्यांना २०००-२००० रूपयांचे ६ हप्ते मिळाले आहेत. आता पीएम किसान योजनेचा सातवा हप्ता डिसेंबर महिन्यापासून मिळण्याची शक्यता असली तरी अद्याप लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेचा ६ वा हप्ताच पोहचलेला नाही. यामध्ये सर्वाधिक शेतकरी उत्तरप्रदेशातील आहेत. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
उत्तरप्रदेशातील ४३ हजार ५४९ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही तर महाराष्ट्रातील लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २३ हजार ५२९ इतकी आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा हा आकडा लाखोच्या घरात असून ज्यांना ६ वा हप्ता मिळालेला नाही त्यांना पुढील हप्ता देखील मिळणार नाही. तसेच जे शेतकरी पीएम किसान योजनेत अपात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- पीएम किसान योजनेत नाव नोंदवून सुध्दा पैसे मिळत नसतील तर अशा शेतकऱ्यांनी प्रथम PM Kisan ही वेबसाईट ओपन करून साईटवरील फार्मर्स कॉर्नरला भेट द्यावी.
- याठिकाणी Edit Aadhar failure Record, Updation of self Registration या लिंक वर जाऊन आवश्यक ते बदल करता येतात.
- नवीन नोंदणी करायची असेल तरीही ती याठिकाणी असणाऱ्या New Registration या पर्यायावर जाऊन करता येते.
- लाभार्थ्यांच्या खात्याची अथवा संपूर्ण गावातील लाभार्थी यादी पहायची असेल तर Benificiary Status आणि Benificiary list हे दोन पर्याय देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे खात्याचा तपशील पाहून शेतकऱ्यांनी दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
या राज्यातील शेतकऱ्यांचे पीएम किसान पेमेंट झाले फेल –
राज्य | रजिस्टर्डकिसान | FTO जेनरेट | पेमेंटफेल |
उत्तर प्रदेश | 15,392,873 | 11,695,324 | 43,549 |
महाराष्ट्र | 4,235,038 | 3,592,622 | 23,529 |
आंध प्रदेश | 3,845,945 | 3,134,723 | 17,605 |
गुजरात | 3,147,106 | 2,918,481 | 15,995 |
राजस्थान | 3,011,471 | 2,501,270 | 12,833 |
तेलंगाना | 2,667,200 | 2,437,324 | 6,945 |
केरल | 2,613,780 | 2,371,984 | 6,564 |
झारखंड | 613,040 | 372,843 | 6,542 |
तमिलनाडु | 2,773,646 | 2,600,802 | 6,289 |
हरियाणा | 1,253,982 | 1,144,400 | 5,209 |
बिहार | 736,900 | 714,012 | 4,727 |
पंजाब | 1,558,642 | 1,196,238 | 4,714 |
ओडिशा | 984,118 | 471,304 | 3,735 |
हिमाचल प्रदेश | 588,099 | 563,482 | 3,112 |
कर्नाटक | 425,311 | 397,481 | 2,756 |
उत्तराखंड | 591,366 | 538,069 | 2,746 |
स्रोत: pmkisan.gov.in
बहुताशी शेतकऱ्यांना त्यांच्या नावातील, आधार कार्डवरील, बॅंकेच्या खाते क्रमांकातील, आएएफएससी कोडमधील चुकांमुळे पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. अशा शेतकऱ्यांनी वेळीच आवश्यक त्या दुरूस्त्या करून घेतल्यास त्यांना डिसेंबर २०२० पासून पुढील हप्ते मिळू शकतात.