Categories: बातम्या राजकीय सामाजिक

दसरा – दिवाळी : छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी वेळ वाढवून देण्याची भाजपाची मागणी

कोल्हापूर | दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय, दुकाने सरू ठेवण्यासाठी रात्री ०९ पर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे ईमेल द्वारे मागणी केली आहे.

सध्या अनलॉक ५ सुरु झाले आहे. यामध्ये हॉटेल, मॉल, दुकाने, व्यापार, जिल्हा अंतर्गत व राज्य अंतर्गत प्रवास अशा अनेक गोष्टी पूर्ववत होताना दिसत आहेत. ५ ऑक्टोबर पासून कोल्हापूरातील बार, हॉटेल्स सुरु करायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. परंतु हे सर्व पर्याय खुले होत असताना छोट्या व्यवसायीक, दुकानदार यांच्यावर दुकाने ७ पर्यंत सुरु ठेवण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. यामुळे या व्यावसायिकांवर अनेक निर्बंध येत आहेत. येत्या काळात नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या मोठ्या सणांची सुरवात होत आहे. याकाळात नागरीकही मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. 

कोरोनामुळे गेली ६ महिने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य नागरीक, हातावर पोट असणारे लोक, छोटे व्यापारी यांनाच याची सर्वाधिक आर्थिक झळ पोचली आहे. या काळात  कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत छोट्या व्यवसायीकांनी प्रशासनास पूर्णपणे सहकार्य केले आहे. सहा महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर आर्थिक उत्पन्नाची घडी बसण्यास या संधीचा फायदा होणार आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Important Shopping Destination