ajit pawar
लोकशाही.न्यूज। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील पोलिसांसाठी महत्वाचे काम करणार असून यामुळे अवघ्या १८० चौरस फूटाच्या घरात राहणाऱ्या पोलिसांना चांगल्या प्रकारची घरे उपलब्ध होणार आहेत. पवार यांनी आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते लगेच कामाला लागले आहेत.
पोलिसांना चांगल्याप्रकारची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यभरातील मुंबई, पुणे, पनवेल सारख्या इतर भागांमध्ये नवे प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुण्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. सध्या राज्यातील पोलिसांना अवघ्या १८० स्क्वेअरफूटाच्या घरात रहावे लागत आहे. ते आपली कायदा आणि सुव्यवस्था बघतात. आपल्यासाठी २४ तास राबतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला काम करायचे आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी पोलिसांच्या घराविषयी आपली भुमिका स्पष्ट केली.
सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लागणारी रक्कम गृहित धरुन बाकीच्या कामांना कितपत निधी द्यायचा? याबाबत माझे कामकाज सुरु आहे. सध्या मी सर्व विभागांचा आढावा घेत आहे. याविषयावर चर्चा करतोय आणि अधिकाऱ्यांशी बोलत आहे. अधिकाऱ्यांचे याबाबत काय मत आहे? हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.