Categories: राजकीय

महाराष्ट्र दौऱ्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अशाप्रकारची कारवाई अपेक्षित होती – शरद पवार

बारामती।२४ सप्टेंबर। शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शरद पवार यांचे नाव याचिकेत होते. याचिकाकर्त्याने तत्कालीन संचालक हे शरद पवारांच्या विचाराचे होते म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

दरम्यान याविषयी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे कि, ‘ मी राज्य सहकारी बँकेचा किंवा कुठल्याही बँकेवर संचालक नव्हतो. जर माझ्यावर ED किंवा राज्य सरकारच्या कुठल्या तपस यंत्रणेने केस दाखल केली असेल तर त्यांना मी धन्यवाद देतो. ज्या संस्थेमध्ये मी साधा सभासद देखील नाही, निर्णय प्रक्रियेत मी सहभागी नव्हतो अशामध्ये माझाहि सहभाग करण्याची भूमिका घेतली आहे.’


पुढे बोलताना पवार म्हणाले माझ्यावर जर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्याच स्वागत करतो. महाराष्ट्रात दौऱ्याला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर अशाप्रकारची कारवाई होणे अपेक्षित होते असेही ते म्हणाले.

गुन्हा दाखल झालेल्या ७२ जणांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना, शेकाप इत्यादि पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यामागे राजकारण आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. धक्कादायक म्हणजे शरद पवार हे बँकेचे संचालक नसताना त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आघाडी सरकारच्या काळात अनेक सहकारी साखर कारखान्यांना तारण न घेता हजारो कोटींच्या कर्जाचे वाटप केले होते. त्यामुळे बँकेला जवळपास २०६१ कोटींचे नुकसान झाले होते असे आरोप करण्यात आले होते. याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी २०१५ साली बॉम्बे हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्या होत्या.

Tags: ईडी शरद पवार
Team Lokshahi News

Recent Posts

  • बातम्या

१ डिसेंबरला शाळा सुरू होणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास… Read More

November 29, 2021
  • नोकरी

ITI धारकांना सुवर्णसंधी; विद्युत विभागात 334 रिक्त पदांची भरती

पणजी | गोवा विद्युत विभाग येथे असिस्टंट लाइनमन/ वायरमन आणि लाइन हेल्पर पदांच्या एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.… Read More

November 29, 2021
  • नोकरी

उत्पादन शुल्क विभाग गोवा येथे 12 वी/पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी

पणजी | उत्पादन शुल्क विभाग गोवा अंतर्गत उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक पदांच्या 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार… Read More

November 28, 2021
  • नोकरी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे 138 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा

गडचिरोली | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, महिला अधिक्षिका, पदव्युत्तर… Read More

November 28, 2021
  • नोकरी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरू, ‘असा’ करा अर्ज

मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत… Read More

November 28, 2021
  • नोकरी

CDAC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 09 डिसेंबर पर्यंत ‘या’ ठिकाणी करा अर्ज

मुंबई | प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) मुंबई येथे प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज… Read More

November 28, 2021
  • नोकरी

ITI धारकांना नोकरीची सुवर्णसंधी – 2070+ पदांसाठी भरती

पुणे | आयटीआय धारकांना नोकरीची चांगली संधी मिळत असून पुणे येथे मेकॅनिक मोटार वाहन / डिझेल मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर /… Read More

November 28, 2021
  • नोकरी

10 वी/ ITI, पदवीधर उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

मुंबई | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर, एमटी फिटर, फायरमन, इंजिन ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ, लस्कर पदांच्या एकूण 19… Read More

November 27, 2021
  • नोकरी

10 वी ते पदवी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

नवी दिल्ली | भारतीय हवाई दल अंतर्गत कमिशन्ड अधिकारी पदाच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने… Read More

November 27, 2021
  • नोकरी

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत 413 रिक्त पदांची भरती

मुंबई | स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय येथे शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ पदांच्या एकूण 413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र… Read More

November 27, 2021