Categories: राजकीय

‘ईडी’लाच फोडला शरद पवारांनी ‘घाम’; पोलिस कमिशनरांसह यंत्रणांची उडाली तारांबळ

मुंबई। २७ सप्टेंबर। महाराष्ट्र राज्य शिखर बॅंक घोटाळाप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात सरकारविरोधी वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. विविध राजकीय पक्षांनी देखील उघडपणे शरद पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची भुमिका घेतल्याने भाजप सरकार आणि ईडी बॅकफूटवर गेल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान शरद पवार यांनी आज ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचा पवित्रा घेतल्याने त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. तर राज्यभरात विविध ठिकाणी ईडी आणि भाजपविरोधात निषेध मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चांना काही ठिकाणी हिंसक वळण लागत असल्याचेही समोर येत आहे. 

याबाबत ईडीने आपल्या भूमिकेवरून युटर्न घेत शरद पवार यांनी कार्यालयात हजर राहण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले जात आहे. तसा मेल शरद पवार यांना पाठवल्याचे ईडीचे म्हणणे आहे. परंतु या केवळ अफवा असून आम्ही ईडीला उत्तर देण्यासाठी नाही तर गुन्हा का दाखल केला हे विचारण्यासाठी जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोठातून सांगण्यात येत आहे. 

शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी सकाळपासून सर्व यंत्रणांची तारांबळ उडाली असून पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये असे सांगण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सकाळी राज्यातील पोलिसांनी पुढाकार घेत पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली नसल्याने पुन्हा पोलिस कमिशनर शरद पवार यांच्या मनधरणीसाठी जाणार असल्याचे दिसत आहे. 

यासर्व प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांना घाम फुटल्याचे यामुळे समोर येत आहे. 

Tags: राज्य बॅंक शरद पवार
Team Lokshahi News

Recent Posts

  • बातम्या

१ डिसेंबरला शाळा सुरू होणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास… Read More

November 29, 2021
  • नोकरी

ITI धारकांना सुवर्णसंधी; विद्युत विभागात 334 रिक्त पदांची भरती

पणजी | गोवा विद्युत विभाग येथे असिस्टंट लाइनमन/ वायरमन आणि लाइन हेल्पर पदांच्या एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.… Read More

November 29, 2021
  • नोकरी

उत्पादन शुल्क विभाग गोवा येथे 12 वी/पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी

पणजी | उत्पादन शुल्क विभाग गोवा अंतर्गत उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक पदांच्या 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार… Read More

November 28, 2021
  • नोकरी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे 138 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा

गडचिरोली | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, महिला अधिक्षिका, पदव्युत्तर… Read More

November 28, 2021
  • नोकरी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरू, ‘असा’ करा अर्ज

मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत… Read More

November 28, 2021
  • नोकरी

CDAC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 09 डिसेंबर पर्यंत ‘या’ ठिकाणी करा अर्ज

मुंबई | प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) मुंबई येथे प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज… Read More

November 28, 2021
  • नोकरी

ITI धारकांना नोकरीची सुवर्णसंधी – 2070+ पदांसाठी भरती

पुणे | आयटीआय धारकांना नोकरीची चांगली संधी मिळत असून पुणे येथे मेकॅनिक मोटार वाहन / डिझेल मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर /… Read More

November 28, 2021
  • नोकरी

10 वी/ ITI, पदवीधर उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

मुंबई | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर, एमटी फिटर, फायरमन, इंजिन ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ, लस्कर पदांच्या एकूण 19… Read More

November 27, 2021
  • नोकरी

10 वी ते पदवी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

नवी दिल्ली | भारतीय हवाई दल अंतर्गत कमिशन्ड अधिकारी पदाच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने… Read More

November 27, 2021
  • नोकरी

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत 413 रिक्त पदांची भरती

मुंबई | स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय येथे शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ पदांच्या एकूण 413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र… Read More

November 27, 2021