मुंबई | आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. अशा आशयाचं ट्विट मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

विधानपरिषदेच्या निकालानंतर सुरू असलेल्या घडामोडीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असल्याची चर्चा आहे. यावर पहिल्यांदाच त्यांची प्रतिक्रिया आली असून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणखी कोणता वेग घेतात हे पहावं लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी या ट्विट मध्ये आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याच कबूल केल असलं तरी यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. याचाच अर्थ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ठाकरे याचे नेतृत्व मानत नसल्याचे आता स्पष्टपणे बोललं जात आहे.