Categories: राजकीय

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर; ‘असे’ असेल संपूर्ण नियोजन

कोल्हापूर | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील रिक्त जागेसाठी व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यासाठी २ नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. १ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. 

 • निवडणूक कार्यक्रम
  • निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक ५ नोव्हेंबर २०२० (गुरूवार)
  • नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक १२ नोव्हेंबर २०२० (गुरूवार)
  • नामनिर्देशन पत्रांची छाननी १३ नोव्हेंबर २०२० (शुक्रवार)
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०२० (मंगळवार)
  • मतदान १ डिसेंबर २०२० (मंगळवार)
  • मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • मतमोजणीचा दिनांक ३ डिसेंबर २०२० (गुरूवार)
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक ७ डिसेंबर २०२० (सोमवार)

निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त काम पाहणार आहेत. जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २०५ मतदान केंद्रे तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ७६ मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ८७ हजार ९१५ तर शिक्षक मतदारसंघासाठी ११ हजार ९९७ इतके मतदार आहेत.

 • आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर पालनाच्या दृष्टिकोनातून भारत निर्वाचन आयोग यांच्या कार्यालयाकडील दिनांक २६ डिसेंबर २०१६ च्या पत्रात नमुद सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे.
 • कोव्हिड-19 च्या अनुषंगाने भारत निर्वाचन आयोग यांनी दिलेल्या सुचनेनुसार नामनिर्देशनाचे वेळी उमेदवारासोबत केवळ २ व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल.
 • नामनिर्देशनाच्या वेळी केवळ २ वाहनांना परवानगी देण्यात येईल.
 • घरोघरी प्रचार करतांना उमेदवारासह केवळ ५ व्यक्तींना परवानगी देण्यात येईल.
 • रोड शो च्या वेळी केवळ ५ वाहनांना परवानगी देण्यात येईल, तसेच वाहनांमध्ये १०० मीटर अंतर आवश्यक आहे.
 • सर्व राजकीय पक्षांनी कोव्हिड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतर राखुन सभा/रॅली इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्याचे आहेत. तसेच कार्यक्रमाच्या वेळी मास्क, सॅनिटायझर इत्यादीचा वापर करण्यात यावा.

जिल्हा शल्य चिकित्सक तसेच  जिल्हा आरोग्य अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोव्हिड-19 च्या अनुषंगाने कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात येत आहेत. मतदान  केंद्रावर सुयोग्य सॅनिटायझेशन, मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन इत्यादी ची सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मतदान पथकाच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच रुग्‍णवाहिका व आवश्यक औषध साठा तयार ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ