मुंबई | शेतकरी वर्गात प्रसिध्द असलेल्या महिंद्रा कंपनीने शुक्रवारी फार्मिंग अॅंड सर्व्हिस या नव्या व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्रात कृषी-ई केंद्रे सुरू केली आहेत. या कृषी-ई केंद्राव्दारे शेतकऱ्यांच्या विकासासाठी लागणारे तंत्रज्ञान डिजीटल सेवांच्या सहाय्याने पुरवण्याचे काम केले जाणार आहे. संपूर्ण पीक चक्राच्या अभ्यासानंतर डिजीटल सेवांव्दारे शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढवले जाईल हे या सेवेव्दारे पाहिले जाणार आहे.
महिंद्रा अॅंड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट ने सध्या औरंगाबाद आणि बारामती येथे हे कृषी ई सेवा केंद्र सुरू केले आहे. त्यानंतर जालना, वर्धा, नांदेड, पुणे, दौंड आणि सोलापूर या जिल्ह्यात ही सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यात अशी केद्रे सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. कृषी-ई सेंटरच्या माध्यमातून कंपनीने यापूर्वीच १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना लागवड खर्च, पीक आरोग्य आणि उत्पादकता यावर परिणाम दर्शवण्यासाठी उपाय तयार केले आहेत.
या कृषी-ई केंद्रात ओमनी वाहिनीचा (Omani Channel हे मल्टी-चॅनेल रिटेलिंग आहे. कंपनी एकाधिक ऑनलाइन चॅनेलमध्ये विक्री करते. उदा. वेब स्टोअर, बाजारपेठा आणि सोशल मीडिया. ओम्नी-चॅनेल शारीरिक आणि डिजिटल दोन्ही उपस्थिती असलेल्या किरकोळ विक्रेत्यांना संदर्भित करते.) दृष्टीकोन ठेवून काम केले जाणार आहे. जिथे शेतकरी डिजिटल अॅप्सच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या सेवा घेऊ शकतात. आणि कॉल सेंटरव्दारे कृषी सहाय्यकांपर्यंत ही पोहचू शकतात.
महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने सुरू केले कृषी-ई केंद्रभारतीय शेतीत सध्या गुंतवणुक आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला तरी उत्पनामध्ये सुधारणा होण्याची खूप गरज आहे. त्यामुळे शेती करण्याच्या पध्दतीत बदल करूनच आम्हाला आमची भूमिका योग्यप्रकारे सिध्द करता येणार आहे. मुख्य लक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे, भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धात्मक खर्चावर तंत्रज्ञान पुरवणे आणि त्यांना उत्पादन वाढवण्यास सक्षम करण्याचे काम महिंद्रा कृषी ई केंद्रामार्फत केले जाणार असल्याचे एम अॅंज एम फार्म इक्विपमेंटचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी सांगितले आहे.