Categories: Featured आरोग्य

…म्हणून त्यांनी केलं फक्त २५ जणांच्या उपस्थितीत लग्न; लग्नाची सगळीकडे चर्चा!

  • आ. आबिटकरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘या’ लग्नाची साऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा असून शेलार-शिंदे कुटूंबियांच्या ‘या’ निर्णयाचे सगळीकडेच कौतुक होत आहे.

कोल्हापूर। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही कोरोनो व्हायरस सदृश रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाघवे इथल्या ऋतुजा शेलार आणि गारगोटी इथल्या किरण शिंदे यांचा विवाहसोहळा अवघ्या २० लोकांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. हा सोहळा म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि शेलार कुटूंबियांनी सर्व समाजाला कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी नेमकं काय करावं याबाबत दिलेलं मोठं उदाहरण म्हणावं लागेल.   (Corona effect: Everywhere Discussion of ‘this’ marriage, happened in the presence of MLA Abitkar)

गेल्या १ महिन्यापासून दोन्ही कुटुंबातील मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. गारगोटी येथील मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडणार होतं… पण… पण कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि दोन्ही कुटुंबीयांचे मोठ्या थाटात लग्न करण्याच स्वप्नं फक्त स्वप्नचं राहीलं.. कारण केवळ २० ते २५ जणांच्या उपस्थितीतच हा लग्न सोहळा पार पडण्याची यांच्यावर वेळ आली.. विशेष म्हणजे नवरदेव किरण शिंदे यांचं स्वतःचं मंगल कार्यालय आहे पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतला, आणि केवळ मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा उरकला… यावेळी पुरोहितांनी देखील आजपर्यंत शेकडो जोडप्यांची हजारो लोकांच्या उपस्थितीत लग्न लावली, परंतु केवळ २०-२५ लोकांच्या उपस्थितीत पार पाडलेला हा एकमेव लग्नसोहळा होता असं म्हंटलय..

शेलार आणि शिंदे कुटुंबीयांनी मनावर दगड ठेऊन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मतदारसंघातील आमदार प्रकाश आबीटकर यांनी या लग्नाला उपस्थिती लावली.. दोन्ही कुटुंबीयांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांचं कौतुक करत नव वधू-वरांना आशीर्वाद दिलेत… शेलार आणि शिंदे कुटुंबीयांप्रमाणे प्रत्येकानं अशाच पद्धतीने सामाजिक भान राखत काम आपली जबाबदारी पार पाडली तर  कोरोनारुपी संकटावर मात करण्यास मोठी मदत ठरू शकेल यात शंकाच नाही… शेलार-शिंदे कुटूंबियांच्या या निर्णयाचे सगळीकडे चांगलचं कौतुक होत आहे. 

Team Lokshahi News