मुंबई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार मोठ मोठे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहतील असा आदेश दिला. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होतील असे जाहीर केले. असं असलं तरी दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकाप्रमाणेच पार पडणार आहेत.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. दहावीचे दोन पेपर बाकी आहेत. २१ तारखेला इतिहास आणि नागरिकशास्त्र तर १३ तारखेला भूगोलचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील.
कोणकोणत्या परीक्षा रद्द?